Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले नवीन चिन्ह

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला अखेर निवडणूक चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) त्यांना तुतारीवाला माणूस चिन्ह दिलं असून शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही दिले आहे.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. वटवृक्ष हे चिन्ह शरद पवार गटाने मागितल्याची माहिती होती. पण निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिलं.

या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

दरम्यान, शरद पवारांना (Sharad Pawar) मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं किंवा शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील. .

Leave a Reply