सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती साजरी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडके, मुकूंद पांडे, अर्थशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. विलास आढाव, उप कुलसचिव प्रदिप कोळी, प्रसाद कुळकर्णी यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
