Wednesday, November 11, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षाचे होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना मध्यरात्री 3 वाजता उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakare) यांचा एक कडवट शिवसैनिक (Shivsena) अशी त्यांची ओळख होती.

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.

दरम्यान, मनोहर जोशी यांचे पार्थिव त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. दुपारी 2 नंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनोहर जोशींची कारकीर्द

मनोहर जोशीं यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांनी केला. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले. किर्ती कॉलेजमधुन बी. ए. केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली.  पुढे समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

 

Leave a Reply