सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील गणित विभागातर्फे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणयात आला होता. एमएससी (Industrial Mathematics with Computer Applications) या कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मेळाव्यात आयटी इंडस्ट्री, ज्योमेट्री-बेस्ड इंडस्ट्री, डाटा सायन्स सेक्टर आणि उद्योग जगतात कार्य करत असलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी तर प्रमुख पाहुणे म्हणून यूएसटी कंपनीचे अध्यक्ष एस. रामप्रसाद उपस्थित होते. या मेळाव्यात विभागाची प्रथम बॅच ते २०२३ ला बाहेर पडलेल्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक माजी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या एम.एससी (IMCA) च्या विद्यार्थ्याना इंडस्ट्रीतील सद्दपरिस्थिती व भविष्यातील संधी यावर मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थिती राहून उत्तम प्रतिसाद दिला.
