Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २३ फेब्रुवारीपासून आयोजन !!

पुणे : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा २३, २४ व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनावळे येथे होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना रास प्रोजेक्ट कन्सल्टंटसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल हिंगे यांनी सांगितले की, औद्योगिक बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचारी आणि खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रात रास करंडक अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा गणली जाते. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून स्पर्धेत ८ निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण २ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सुरोज बिल्डकॉन इलेव्हन, एसकॉन प्रोजेक्टस्  इलेव्हन, एसजे कॉन्ट्रॅक्टस्  इलेव्हन, रत्नरुप प्रोजेक्ट्स इलेव्हन, मिलेनियम इंजिनिरर्स अँड काँट्रॅक्टरस इलेव्हन, न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंटस इलेव्हन, रोहन बिल्डर्स (इंडिया) इलेव्हन, आरकॉन पुणे  इलेव्हन या ८ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. हे सामने साखळी आणि बाद फेरी या पध्दतीमध्ये खेळवण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रूपये पारितोषिक आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये पारितोषिक आणि करंडक देण्यात येणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना सन्मानचिन्ह आणि श्री. प्रशांत सुरडीकर  यांचेकडून प्रत्येकी रोख ११ हजार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना सन्माचिन्ह आणि नोव्हा इलेक्ट्रिकल्स यांचेकडून रोख ५ हजार तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला सन्मानचिन्ह आणि डेको फ्लोअर प्रा. लि. यांचे कडून रोख ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन “हॅवमोर आइस क्रीम” समूहाचे व्हाइस प्रेजिडेंट जियॉंगवूक ली, जनरल मॅनेजर धरमवीर कुमार आणि सुरोज बिल्डकॉन चे व्यवस्थापकीय संचालक सचिनजी बियाणी यांच्याहस्ते होणार आहे.
गतवर्षी सुर्या इलेव्हन संघाने विजेतेपद तर, मिलेनियम इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading