Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

शिक्षण हक्क कायद्यासाठी रिपब्लिकन पार्टीचा शिक्षण आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा

पुणे : शिक्षण हक्क कायदा (RTE) मध्ये राजपत्राद्वारे दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेला बदल रद्द करावा. हा बदल गोरगरीब, आर्थिक दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे भविष्य उध्दवस्त करणारा असून जुन्या नियमावलीची अंमलबजाणी करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला .

केंद्र शासनाने सन २००९ साली शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला त्यामुळे गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विनाअनुदानीत शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. परंतू राज्य सरकार कडून बेकायदेशीर बदल करण्यात आलेला आहे. आरटीई मधील कलम-१२ नुसार खाजगी विनाअनुदानीत शाळेमध्ये प्रवेश स्तरावर कमीत कमी २५टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ठेवणे व इयत्ता ८वी पर्यंतच्या त्यांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार आहे. परंतू केवळ आणि केवळ खाजगी शिक्षण संस्थांच्या भांडवलदारांचा स्वार्थ जपण्यासाठी आणि आरटीई अंतर्गत बांधीलकीतून पळवाट काढण्यासाठी सरकारने आरटीई नियमामध्ये अन्यायकारक बदल केलेला आहे.

बदलानुसार खाजगी विनाअनुदानीत शाळेच्या किमान १ कि.मी. परिसरात खाजगी किंवा विनाअनुदानीत शाळा आहेत. अशा शाळांना २५ टक्के प्रवेशा बाबतची अट लागू नसेल हे बदल धोकादायक व केंद्र शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करणारा आहे .त्यामुळे गरीब ,गरजू ,वंचित व दलित उपेक्षित समाजाला व त्यांच्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करुन तात्काळ नवीन आदेश रद्द करुन जुन्या आदेशानुसार कार्यवाही व्हावी अन्यथा आणखी तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी दिला आहे .
या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण ,प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड ,श्याम गायकवाड महिपाल वाघमारे सरचिटणीस पुणे शहर,भगवान गायकवाड ,वसंत बनसोडे ,लियाकत शेख ,संदिप धांडोरे ,सजय जाधव ,मंगल रासगे ,निलेश आल्हाट,सुगत धसाडे,विजेता गायकवाड ,राहुल कांबळे ,विशाल धावारे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

या मोर्च्यात पुणे शहरातील शेकडो महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading