Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

समूहगान स्पर्धेत अहिल्यादेवी प्रशालेला विजेतेपद

पुणे : ‘मातृमंदिर संस्थे’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूहगान स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सने विजेतेपद पटकाविले. ‘भव्य दिव्य भारता, सार्वभौम भारता’ हे गीत शाळेतील १४३६ विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे गायले. पर्यवेक्षिका चारुता प्रभूदेसाई यांनी या गीताचे लेखन केले, तर मानसी देशपांडे यांनी संगीतबद्ध केले होते. tyaaMमुख्याध्यापिका अनघा डांगे, शिक्षिका वैशाली सोनवणे आणि अमृता सबनीस यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम : अहिल्यादेवी मुलींची शाळा, पुणे
द्वितीय : पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर
तृतीय : ज्ञानगंगा विद्यानिकेतन, संगमनेर
उत्तेजनार्थ : स्वस्तिक विद्यालय, गोवा

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading