CDK इंडियातर्फे कन्व्हर्जन्स 2024 हा ९ वा फॅमिली डे साजरा
पुणे : ऑटोमोटिव्ह आणि संबंधित उद्योगांमधील डीलरशिप आणि OEM साठी क्लाउड-आधारित सॉफ्टवेअरचे अग्रगण्य पुरवठादार CDK ग्लोबल इंक. ने ११ फेब्रुवारी रोजी कन्व्हर्जन्स 2024 हा आपला ९ वा फॅमिली डे पुण्यातील रेसिडेन्सी क्लब येथे साजरा केला. आपल्या कुटुंबियांसह CDK कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून या वर्षीच्या कन्व्हर्जन्सची थीम ‘सेलिब्रेटिंग द जर्नी’ अशी होती. CDK च्या कन्व्हर्जन्सचे उद्दिष्ट सातत्याने संस्थेच्या कामगिरी आणि प्रगतीसाठी CDK कुटुंबाच्या अमूल्य योगदानाची पावती देणे, सन्मान करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे आहे.
कन्व्हर्जन्स 2024 ची सुरुवात एकता आणि सहयोगाची भावना प्रज्वलित करणाऱ्या दीप प्रज्वलनाने झाली. या आनंददायी कार्यक्रमात कन्व्हर्जन्सची आकांक्षा दर्शविणाऱ्या व्हिडीओमध्ये सर्वजण गुंगून गेले होते. CDK कुटुंबांच्या विलक्षण कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. सर्वांसाठी एक उत्तम ठिकाण असलेल्या CDK India च्या लोकाचार आणि संस्कृतीच्या खऱ्या भावनेचे दर्शन यातून झाले. केरळ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, पश्चिम बंगाल आणि जम्मू आणि काश्मीर यासारख्या विविध राज्यांच्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे सर्व रंगमंचीय कार्यक्रम विविधतेतील एकतेला समर्पित होते.
CDK ग्लोबल इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद चतुर्वेदी यांनी सर्वांचे स्वागत केले. बहुप्रतिक्षित अवॉर्ड्स नाईटने कार्यक्रमाची सांगता झाली. CDK ग्लोबल इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना त्यांच्या कामातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले. विजेत्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमळ उपस्थितीत ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार म्हणजे कर्मचाऱ्यांची बांधिलकी, अखंड प्रयत्न आणि विविध स्तरांवर यश मिळवण्यासाठी केलेल्या उत्साहाचे कौतुक होते.
CDK टीमच्या प्रयत्नांना दाद देत अरविंद चतुर्वेदी म्हणाले, “CDK मध्ये आम्ही एक एकत्रित टीम म्हणून काम करतो. केवळ आमच्या सामर्थ्याचा लाभ घेण्यासाठी नाही तर आमच्या सामूहिक यशाची पावती म्हणून आणि तो आनंद साजरा करण्यासाठी देखील वेळ काढतो. ‘सेलिब्रेटिंग द जर्नी’ ही या वर्षीची संकल्पना आमच्या कंपनीचे महत्वपूर्ण टप्पे आणि यशाचे सुंदर वर्णन करते. कन्व्हर्जन्स 2024 म्हणजे आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून मिळालेल्या दृढ पाठबळा बद्दल कृतज्ञता व्यक्त करून CDK कुटुंब म्हणून एकत्र येण्याचा एक महत्त्वाचा क्षण आहे. एकमेकांप्रती असलेल्या आमच्या अढळ विश्वासामुळे आणि आमच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे हे हे वर्ष उल्लेखनीय बनवणे शक्य झाले आहे.”
कार्यक्रमाची सांगता करणाऱ्या नृत्य सादरीकरणातून CDK कुटुंबांचे यश आणि एकोपा साजरा करण्यात आला.
