Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच – विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर

मुंबई :पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षाची नाराजी नाही. तसच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही, असे सांगत विधीमंडळातील पक्ष बहुमत लक्षात घेता अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता देत असल्याचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. तसेच शिवसेने प्रमाणे दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. राष्ट्रवादीतील पक्षफुटी नंतर तब्बल 7 महिन्यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज निर्णय देण्यात आला.

निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोण हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. मात्र, विधीमंडळात कोणत्या पक्षाला बहुमत आहे, हा एकमेव निकष लक्षात घेतला तर, 53 पैकी 41 आमदार अजित पवार गटाकडे असल्याने राष्ट्रवादीचा अधिकृत पक्ष म्हणून अजित पवार गटाला मान्यता देत आहे.

निर्णय देण्यापूर्वी मूळ पक्ष कोणता हे ठरवणे गरजेचे आहे, असे सांगत नार्वेकरांनी निकाल वाचनाला सुरूवात केली. शिंदे गटाची केस आणि न्यायालयाचा निकाल लक्षात घेवून हा निकाल देण्यात आला आहे. शिंदे गटाच्या केसमध्ये पक्ष ठरवण्याचा अधिकार मला होता. त्याच स्वरूपाची ही याचिका होती. शरद पवार यांच्या मानाविरूद्ध जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे, असे सांगत नार्वेकरांनी अजित पवार गटाच्या 41 आमदारांना पात्र असल्याचे सांगितले. तसेच शरद पवार गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर काय म्हणाले – 

  • 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले होते.
  • नेतृत्व रचनेसाठी पक्ष संघटना लक्षात घेतली. राष्ट्रवादीच्या सर्व समित्यांची बाजू देखील लक्षात घेतली.
  • कार्यकारणी आणि अध्यक्षांचे अधिकार लक्षात घेतले.
  • 10 व्या सूची नुसार कारवाई होतिये का हे ठरवावे लागले.
  • पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.
  • अध्यक्ष पदाची निवड घटनेला धरून नाही, असा दोन्ही पक्षांम कडून दावा
  • विधीमंडळ पक्षात बहुमत कोणाला हा एकमेव निकषावर निकाल दिला
  • शरद पवार यांच्या मानाविरूद्ध जाणे म्हणजे पक्ष सोडणे नव्हे.
  • अजित पवार गटाचे 41 आमदार पात्र
  • शरद पवार गटाने 10 व्या सूचीचा गैरवापर करू नये
  • पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधी मंडळ पक्षाची नाराजी नाही
  • पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही
  • पक्षात लोकशाही असेल यांची दक्षता घ्यावी
  • शरद पवार गटाने 10 व्या सूचीचा वापर आमदारांना शिक्षा करण्यासाठी शस्त्र म्हणून करू नये

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading