डिजिटल व्यवसाय कर्जासाठी KreditBee आपल्या ऑफरचा विस्तार करते आहे,
बेंगळुरू : भारतातील आघाडीचे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या KreditBee ने आता व्यवसायासाठी कर्ज देण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी त्यांची योजना स्पष्ट केली. कोणकोणत्या उत्पदनांसाठी कर्ज दिले जाईल, हे देखील त्यांनी सांगितले आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या ग्राहकांसाठी ब्रँडची ही कर्जाची सेवा असेल. या योजनेद्वारे कंपनी आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या तसेच भारतातील छोट्या उद्योगांना तारणमुक्त कर्ज देण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.
KreditBee च्या नवीन ऑफरसह, व्यापारी 15 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज घेऊ शकतो. RBI द्वारे परवानाकृत इन-हाउस NBFC, KrazyBee यांच्या माध्यमातून हे कर्ज घेता येईल. तसेच याचा परतफेड कालावधी 3 वर्षांपर्यंत असेल. KreditBee सध्या सुमारे 3000 KYB वर आणि 2000 हून अधिक उद्यम बाबत विचार करते आहे. ब्रँडचे धोरणात्मक उद्दिष्ट पुढील 2-3 वर्षांत व्यवसाय विभागाकडून ~20-25% योगदानासह, कर्ज पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे आहे. या वाढत्या व्यवसायांच्या अनुषंगाने, कर्जाची रक्कम हळूहळू वाढवणे असे क्रेडिटबीचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत 25 लाखांपर्यंतची कर्जे आणि 10 वर्षांची दीर्घकालीन परतफेड मुदत याचा समावेश असेल.
वैयक्तिक कर्ज विभागामध्ये क्रेडिटबी प्रमुख स्थानावर आहे, असुरक्षित कर्ज विभागात त्यांचा मासिक वितरण दर हा 1500 कोटी रुपये एवढा आहे. याच यशाच्या धर्तीवर ब्रँडने आता तशाच प्रकारच्या योजना राबवत महानगरांमधील लहान व्यवसायांमध्ये आणि त्यानंतर टियर-2/3 शहरांमध्ये यश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
लॉन्च प्रसंगी, क्रेडिटबीचे सह-संस्थापक आणि सीईओ मधुसूदन एकंबरम म्हणाले, “छोट्या उद्योग समूहांना कर्ज देऊन सक्षम करण्यासोबतच अधिकाधिक रोजगार देण्याचे आमचे ध्येय आहे. छोटे उद्योग समूह आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. KreditBee वर, आम्ही आमच्या 1 कोटींहून अधिक मौल्यवान ग्राहकांची, त्यांच्या मोठ्या वैयक्तिक कर्जाबाबत सखोल माहिती मिळवली आहे. ज्यात अगदी कमी किंवा कोणताही कर्ज इतिहास नसलेल्या ग्राहकांचा समावेश आहे. नवीन उत्पादन हे आमच्या विद्यमान ऑफरिंगला पूरक आहे, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि पगारदार ग्राहकांना आपल्या छोट्या गरज पूर्ण करण्यासाठी कर्ज देते. डिजिटल प्रक्रिया आणि मुक्त कर्जांद्वारे, आम्ही कमी दर्जाच्या व्यवसायांसाठी क्रेडिट अंतर भरून काढणे, यश वाढवणे आणि भारताच्या लहान व्यवसाय क्षेत्राच्या विकासात योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.”
लघु व्यवसाय कर्जाची वैशिष्ट्ये:
अर्जापासून ते वितरणापर्यंतचा एंड -टू-एंड डिजिटल प्रवास
कर्जासाठी कुठूनही आणि केव्हाही अर्ज करण्याची सोय
कर्जाची जलद आणि अखंड प्रक्रिया
स्पर्धात्मक व्याजदर
KreditBee सध्या अनेक प्रकारची वैयक्तिक कर्जे, ऑनलाइन/ऑफलाइन चेकआउट फायनान्स आणि डिजिटल गोल्ड गुंतवणूक ऑफर करते. डिजिटल कर्ज देण्याशिवाय, क्रेडिटबीने यात डिजिटल-सक्षम सुरक्षित कर्जे आणि मालमत्तेवरील कर्जे यांमध्ये प्रवेश केला आहे. ब्रँड विमा, क्रेडिट स्कोअर अहवाल आणि व्यापारी-साइड ऑफर यासारख्या आर्थिक सेवा देखील ऑफर करतो.
