Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

युरोनिक्स् करंडक क्रिकेट स्पर्धेत केपी वॉरीयर्स संघाला विजेतेपद !!

पुणे :  ईसीसीएल तर्फे आयोजित ‘युरोनिक्स् करंडक’ स्पर्धेत निखील निंबाळकर याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर कोलते पाटील डेव्हलपर्सच्या केपी वॉरीयर्स संघाने पंचशील वॉरीयर्स संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

सिंहगड रोड येथील कोद्रे फार्म्स्च्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केपी वॉरीयर्स संघाने ६४ धावांचे लक्ष्य उभे केले. निलेश लोंढे याने १८ धावा आणि अक्षय सम्रीत याने १६ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्यासमोर पंचशील ग्रुपच्या पंचशील वॉरीयर्स संघाचा डाव ५५ धावांवर मर्यादित राहीला. मयुर कांबळे याने २३ धावा आणि शकील शेख याने २१ धावा करून पंचशील संघाकडून प्रतिकार केला. निखील निंबाळकर याने १२ धावात ३ गडी बाद करून केपी वॉरीयर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण युरोनिक्स्चे संचालक अभिषेक जैन यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या केपी वॉरीयर्स संघाला आणि उपविजेत्या पंचशील वॉरीयर्स संघाला करंडक आणि रोख पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत एबीआयएल शार्कस्, न्याती वॉरीयर्स, व्हिटीपी लिजंड्स, पुणेरी पलटण, मालपाणी क्रिकेट क्लब आणि सॉलिटेअर टायटन्स् असे एकूण ८ बांधकाम क्षेत्रातील संघ सहभागी झाले होते.

युरोनिक्स् हा वॉशरूम अ‍ॅक्सेसरीजमधील आघाडीचा ब्रँड असून युरोनिक्सने त्यांच्या ग्राहकांसाठी या कॉर्पोरेट क्रिकेड लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. पुढील वर्षी आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर क्रिकेट लीग आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
केपी वॉरीयर्सः ८ षटकात ६ गडी बाद ६४ धावा (निलेश लोंढे १८, अक्षय सम्रीत १६, मयुर कांबळे २-१०, बालाजी पवार २-१७) वि.वि. पंचशील वॉरीयर्सः ८ षटकात ६ गडी बाद ५५ धावा (मयुर कांबळे २३, शकील शेख २१, निखील निंबाळकर ३-१२, ज्ञानेेश नावकर २-१२); सामनावीरः निखील निंबाळकर;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading