कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा‘इंद्रायणी’ लवकरच येतेय भेटीला
कलर्स मराठी नेहमीच प्रेक्षकांसाठी नव नवीन आशय असलेल्या मालिका घेऊन येते. नुकतीच कलर्स मराठीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘इंद्रायणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘इंद्रायणी’ ही एका लहान मुलीची कथा आहे. जिची निरागसता आणि बुद्धिमत्ता सर्वांनाच थक्क करून सोडेल. आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ घालायला येत आहे. टिझर मध्ये इंद्रायणी आणि तिचे मित्र यांची मस्ती पाहायला मिळते. ही मालिका प्रेक्षकांना बालपणीच्या निरागसतेची जादू आणि आपल्या जीवनाला आकार देणारे बंध पुन्हा अनुभवते. खोडकर निरागस मुलांची कथा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
