Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

मोफत कॅन्सर व विविध रक्त चाचण्यां तपासणी व रक्तदान शिबिर

पुणे : कर्करोग जनजागृतीसाठी श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे व फर्ग्युसन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. अनिता राजीव सप्रे व स्वर्गीय सुजय सुरेश सकपाळ यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व मोफत विविध रक्त चाचण्यां तपासणी शिबिराचे आयोजन आज रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. सदर शिबिरात ५६ रक्तपेशव्यांची संकलन तर साधारण सव्वाशे अधिक नागरिकांनी रक्त चाचण्या केल्या. रक्त संकलनासाठी ओम ब्लड सेंटर यांचे तर रक्त चाचण्यांसाठी एच.एल.एल हिंद लॅब चे सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उद्योजक किसनजी भोसले उपस्थित होते, तर सामाजिक कार्यकर्त्या मेघना मराठे साने, जनकल्याण फाउंडेशनचे मुजफ्फर इनामदार, श्री काळभैरवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश घोलप, उपाध्यक्ष मंगेश उतेकर, सचिव रवींद्र मोरे, सरचिटणीस मोहन भोसले, खजिनदार कदम, यांच्यासह सोशिल्पाताई साळुंखे, शैलेश उतेकर, ज्ञानेश्वर भोसले, ज्येष्ठ गोभक्त सूर्या पुजारी, पि. टी. जगदाळे, महेंद्र लाड आदी मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकपाळ यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading