Sunday, April 5, 2026
Latest NewsPUNE

‘श्री बालाजी महानाट्या’ने पुणेकर भारावले

पुणे : श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘श्री बालाजी महानाट्याच्या रूपाने पुणेकरांना पहिल्यांदाच श्री बालाजी यांचा इतिहास पाहायला मिळाला. आज या महानाट्याची सांगता झाली. नेत्रदीपक अशा पाच मजली भव्य रंगमंचावर सादर झालेल्या महानाट्यात श्री बालाजी यांचे भूलोकी आगमन, त्याच्या लीला, कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी यांच्याशी श्री बालाजी यांचे असलेले नाते… अशा अनेक पौराणिक कथा पाहून पुणेकर रसिक भारावून गेले होते. या महानाट्यातून जमा झालेला निधी पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या इस्कॉन मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आला आहे. 

या महानाट्यात तब्बल 250 हौशी कलाकार, 70 हून अधिक नृत्य कलाकार, घोडे, रोबोटिक हत्ती, आदींचा सहभाग होता. महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्श विशाल दीपक धुमावत आणि ॲड. सनी रवींद्र कोळपकर यांचे आहे. श्री बालाजी महानाट्य’ ला अमोद कुलकर्णी यांनी संगीत दिले तर नृत्य दिग्दर्शन तेजस्विनी साठे यांनी केले आहे.

या महानाट्याचे उद्घाटन श्री त्रिदंडी श्रीमन्नारायण रामानुज चिन्ना जेयर स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी उद्योजक नितीन चोरडिया, बिगबॉस फेम अभिनेते अभिजीत बीचुकले आदी उपस्थित होते. तर चार दिवस चाललेल्या या महानाट्या दरम्यान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. ‘ चोरडिया कॉर्नर मैदाना, कोंढवा येथे आयोजित या महानाट्याला पुणेकरांनी चारही दिवस मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading