Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्ट तर्फे ४७६ रुग्णांची मोफत डोळ्यांची तपासणी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत मोफत डोळे तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुण्याच्या विविध भागातील ज्येष्ठांसह तरुणाईने देखील सहभाग घेतला. यावेळी ४७६ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.

जय गणेश प्रांगण, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर झालेल्या शिबीराच्या उद््घाटनप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, राजाभाऊ घोडके, विजय चव्हाण, अंकुश रासने, राजेंद्र सूर्यवंशी, इंद्रजित रायकर, राजाभाऊ चव्हाण, मंगेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी आणि सहका-यांनी शिबीरांच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी १९१ रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करीता ट्रस्टचे पत्रही देण्यात आले. तसेच या नेत्र रुग्णांची ट्रस्टच्या मोफत रक्त तपासणी केंद्र द्वारे मोफत रक्ताच्या तपासण्याही करुन देण्यात येणार आहेत.

आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत काचबिंदू शस्त्रक्रिया, मोफत पडद्याच्या शत्रक्रियांसह विविध तपासण्या करण्यात आल्या.
रेणुका नेत्रालय, सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन, ससून सर्वोपचार रुग्णालय यांनी शिबीरात सहभाग घेत सेवा दिली. दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. याकरिता ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading