Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRA

बार्टी चे उपकेंद्र छत्रपती संभाजीनगर येथे होणार

छत्रपती संभाजीनगर  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,महाराष्ट्र राज्य (बार्टी) चे उपकेंद्र छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने सचिन निकम, गुणरत्न सोनवणे संशोधक विद्यार्थी अतुल कांबळे हे मागील अनेक दिवसांपासून बार्टी कार्यालय व मंत्रालयात पाठपुरावा करत होते. नुकतेच बार्टी चे महासंचालक सुनिल वारे यांनी उपकेंद्रासाठी नक्षत्रवाडी भागातील प्रस्तावित भूखंडाची पाहणी करुन 10 एकर जागेवर उपकेंद्र स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे त्यानुसार सविस्तर कृती आराखडा ही तयार करण्यात आला आहे असे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेकडो संशोधक विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी, प्रगती अहवाल अश्या विविध कामांसाठी पुणे येथील मुख्य कार्यालयात जावे लागत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना सुलभ व्हावे या करिता बार्टीच्या उपकेंद्र औरंगाबाद येथे असावे या साठी विद्यार्थ्यांची मागणी होती त्यानुसार महासंचालक सुनील वारे यांनी भेट देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मराठवाडा,विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांना या उपकेंद्रामुळे मोठा दिलासा मिळणार असून बार्टीच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी हे उपकेंद्र फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे उपकेंद्र उभारणीसाठी जलदगतीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी विद्यार्थी संघटना पाठपुरावा करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading