Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील तरुण उद्योजिकेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

पुणे : भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)च्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनात पुण्याच्या तरुण उद्योजिका मनस्वी केले यांचा नुकताच प्रतिष्ठित ‘यंग अचिव्हर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या हस्ते यावेळी मनस्वी केले यांना सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथील ताज पॅलेस येथे नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला.

नरेडको नेक्स्टजनचे अध्यक्ष जय मॉर्झारिया, नरेडकोचे अध्यक्ष हरी बाबू, नरेडको नेक्स्टजनचे पुढील अध्यक्ष (प्रेसिडेंट इलेक्ट) रवी रेड्डी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मनस्वी केले वय वर्षे २२, यांनी जून २०२३ मध्ये क्योझोन हॉस्टेल्स या कंपनी अंतर्गत ‘माय हॉस्टेल रूम’ ची स्थापना केली. त्यांच्या या स्टार्टअपने वेगाने विस्तार करत पुण्यात सहा हॉस्टेल्सच्या माध्यमातून ४०० बेड्सची क्षमता सुरू केली. शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये तब्बल २००० विद्यार्थ्यांना सामावून घेणारी ही हॉस्टेल्स पूर्णत्वास नेण्याचा मनस्वी यांचा मानस आहे.

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना माय हॉस्टेल रूम चालवण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या सर्व टीमचे कौतुक मनस्वी यांनी केले. पुण्यातील रिअल इस्टेटच्या लँडस्केपचा विचार करत असताना स्टुडंट हाउसिंगकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गेल्या १०-१५ वर्षांत पुण्यातील निवासी प्रकल्पांच्या विभागात पुरेशी प्रगती झाली आहे. मात्र अद्यापही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात स्टुडंट लिविंग सेगमेंटमध्ये अनेक  कमतरता आहेत याकडे लक्ष वेधत पुण्यातील विविध विद्यापीठे दरवर्षी नवीन अभ्यासक्रम सुरू करत असल्याने, शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading