ॲक्शनपट ‘झुंबाड’ चित्रपट रसिकांच्या भेटीला
आदित्याराजे मराठे प्रोडक्शन निर्मित असलेला ‘झुंबाड’ हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये अभिनेते आदित्यराजे मराठे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या अगोदर त्यांचा “नाद एकच बैलगाडा शर्यत” या चित्रपटाला व त्यातील गाण्यांना प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली होती. झुंबाड हा चित्रपट ॲक्शन,कॉमेडी, ड्रामा याच बरोबर भरपूर मनोरंजन या चित्रपट आहे.
लेखक आणि दिग्दर्शन चंद्रकांत रमेश शेंडे यांनी केले असून या चित्रपटात गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजामध्ये त्याचबरोबर हृतीक गंगावणे, आकाश साठे अशा गायकांनी गाणी गायली आहेत. तर गीतकार संभाजी बारबोले, राहुल सूर्यवंशी, धनराज जाधव यांनी गाण्याचे लेखन केले आहे. या चित्रपटामध्ये आदित्यराजे मराठे, ऐश्वर्या दौंड, सूरज माने, प्रिया वाघमोडे, संभाजी बारबोले,ओम कांबळे,अमित माने, सिकंदर हिरनाईक, अनिकेत सरवदे, काजल शिंदे, यांनी अभिनय केला आहे.
या चित्रपटाचे कॅमेरामन तेजस दिलिप नेवसे यांनी केले असून संकलन सूरज बंड यांनी केले आहे. या चित्रपटाचे संगीत प्रतीक कुंभार व संभाजी बारबोले यांनी केले असून नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. झुंबाड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी माहिती आदित्यराजे मराठे यांनी दिली.
