Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

भक्तांना भवसागरातून तारून नेणार श्री स्वामी समर्थ

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत आपण स्वामींची लीला पाहतो. आतापर्यंत आपण सुशीलाची गोष्ट पाहिली. तिचा होणाऱ्या नवऱ्याचा लग्न मंडपात लग्न होण्यापूर्वीच मृत्यू होतो आणि ह्या सगळ्याचा आरोप सुशीलावर केला जातो की ती अपशकुनी आहे. स्वामी अनोखी लीला करतात आणि सुशिलावर केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करतात. येत्या महागुरुवारच्या भागात आपण स्वामींची आणखीन एक लीला पाहणार आहोत, ज्यात रामाचार्य आणि समुखचे सगळे प्रयत्न असफल ठरतात आणि लक्ष्मणचं अनुष्ठान पूर्ण होतं. तो स्वामींकडे जातो. स्वामी त्याला एक भांड देतात आणि सांगतात विहिरीतनं एक मासा पकड आणि तो मुंबईच्या समुद्रात नेऊन सोड. लक्ष्मण विहिरीत मासा पकडायला जात असताना विहिरीत पडतो, आता तो कोणत्याही क्षणी बुडून मरणार अशी परिस्थिती असताना स्वामी कोणती लीला घडवणार? दुसरीकडे तान्ही नावाची नायकीण एकनाथला भुलवू शकत नाही कारण त्याने आपला सर्वस्व गुरूला म्हणजेच स्वामींना अर्पण केले आहे. हे असूनही पुन्हा पुन्हा प्रयत्न करणारी तान्ही आता स्वामींचा तपोभंग करायला मठात येते. तिचा मनसुबा स्वामी ओळखून आहेत, पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी नक्की बघा, जय जय स्वामी समर्थ, महागुरुवार, ८ फेब्रुवारी, रात्री ८.०० वा. लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading