Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

 सुहाना स्पयसिस वेअरहाऊस, यवतला मिळाले आयजीबीसी नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशन 

शाश्वत विकासात आघाडीवर असलेल्या सुहाना स्पयसिस वेअरहाऊसयवतपुणे यांना गेल्या महिन्यात चेन्नई येथे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसीद्वारे प्रतिष्ठित तात्पुरते नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशन प्रदान करण्यात आलेकंपनीसाठी हा अभिमानास्‍पद क्षण होताआनंद चोरडिया यांची संकल्पना आणि रचना असलेला या प्रकल्पाला वेअरहाऊस अॅण्‍ड इंडस्‍ट्रीयल कॅटेगरी अंतर्गत देशात प्रथम क्रमांक मिळाला आहेनेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशनमधून सुहाना स्पयसिस टीमची पर्यावरणीय शाश्वतताऊर्जा कार्यक्षमता आणि समुदायाच्या सर्वांगीण कल्याणाप्रती असलेली कटिबद्धता सार्थ ठरतेया उपलब्‍धीमधून प्रविण मसालेवालेची दर्जा  डिझाइनच्‍या सर्वोच्‍च मानकांची पूर्तता करणारे स्‍पेसेस निर्माण करण्‍याप्रतीतसेच पर्यावरणासाठी सकारात्‍मक योगदान देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

“सुहाना स्पयसिस वेअरहाऊस रीड्यूसरीजनरेट, रिन्यू अॅण्‍ड रिपरपोस या मुलभूत तत्त्वांचे पालन करते आणि ऊर्जा निर्मितीच्‍या नवीकरणीय स्रोतांवर अवलंबून आहेतसेच इमारती  प्रक्रियेसाठी आवश्‍यक 100% सोलार उर्जेवर चालते,” असे सुहाना स्पयसिसच्‍या टेक्‍नॉलॉजी अॅण्‍ड इनोव्‍हेशनचे संचालक आणि  इको फॅक्‍टरी फाऊंडेशन (टीईएफएफचे संस्‍थापक आनंद चोरडिया म्‍हणाले.

आनंद चोरडिया यांनी या मान्‍यतेसाठी आभार व्‍यक्‍त केलेते म्‍हणाले,”आयजीबीसीकडून मिळालेल्‍या नेट झीरो एनर्जी सर्टिफिकेशनमधून शाश्‍वततेप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येतेआमचे सर्व विद्यमान  भावी प्रकल्‍प जबाबदार  पर्यावरणाप्रती जागरूक विकासासाठी उत्तम उदाहरण असतीलतसेच नाविन्‍यता  पर्यावरणाप्रती जागरूकता एकमेकांशी संलग्‍न राहणाऱ्या पद्धतींना दाखवतील.

अशा पायाभूत सुविधांच्या विकासामुळे लवकरच नेट झिरो इंडिया गाठण्यात मदत होईल.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading