Saturday, June 13, 2026
Latest NewsSports

बॉडीबिल्डिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला रौप्य पदक

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी संकेत संजय काळे बॉलीबिल्डर स्पर्धेत देशात दुसरा आलाय. केरळमध्ये रविवारी झालेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप २०२२-२३’ या स्पर्धेत रौप्य पदक पटकावत संकेतने उज्वल यश संपादन केले आहे.

केरळमधील युनिव्हर्सिटी ऑफ कालिकत येथे रविवारी (४ फ्रेबुवारी) ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पुण्याचे नेतृत्व केले. या स्पर्धेत संकेतने दुसरा नंबर मिळवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिप वर आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे. गेल्या वर्षी देखील याच स्पर्धेत संकेतने तिसरा क्रमांक पटकावला होता.

या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकार, प्रभारी कुलसचिव (डॉ.) विजय खरे, माजी विद्यार्थी संघाचे संचालक प्रा. (डॉ.) संजय ढोले, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. प्रतीक दामा यांनी संकतेला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही इंडियन बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेतही जुनियर “भारत श्री” होण्याचा मान बॉडीबिल्डर संकेत संजय काळे यांनी मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading