सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नाटकावरून ‘रामायण’
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखान करण्यात आले होते. त्यानंतर भाजप प्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला होता. आता त्याचा पुढचा अध्याय विद्यापीठाच्या आवारात असलेल्या ललीत कला केंद्रात रंगला आहे. येथे काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एका पौराणिक नाटकातील संवादावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सादर कर्त्या विद्यार्थ्यांमध्ये ‘रामायण’ घडले आहे. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. तरी पूर्वे कडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखल्या जाणारया पुणे विद्यापीठात हे काय चाललंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अभाविप पदाधिकाऱ्यांनी नाटक करणारे चार विद्यार्थी आणि ललित कला केंद्र प्रमुख प्रवीण भोळे यांच्याविरोधात चतुश्रुंगी पोलिसात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
