Tuesday, June 2, 2026
Latest NewsPUNE

लोकमान्य हॉस्पिटलने केला गुडघाप्रत्यारोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिक इम्पालंटचा वापर

पुणे: महाराष्ट्रात प्रथमच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या हॉस्पिटलमधे रोबोटीकच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिकचा सांधा वापरण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी यशस्वी केली.
या विशेष शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की, गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहेत. या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी व्हाव्यात म्हणून जगभरातील तज्ज्ञ संशोधनात्मक अभ्यासाद्वारे विविध प्रयोग करत असतात. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रप्रणाली, सुसज्ज थिएटर, निष्णात सर्जनची टीम त्याचबरोबर उत्तम दर्जाचा इम्प्लांट असणे गरजेचे असते.

आजकाल गुडघेदुखी ही तरुण वयातसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांच्यामध्येही संधिवाताचे प्रमाण वाढते आहे. अशावेळी वय कमी आहे म्हणून रुग्ण शस्त्रक्रिया टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. तरुण वयात सर्जरी केल्यास पुन्हा काही वर्षांनी सांधेरोपण सर्जरी करावे लागेल म्हणून ते दुखणे सहन करत राहतात त्याचा दैनंदिन जीवनातील हालचालीवर परिणाम होतो. या दृष्टीने इम्पलांटचे आयुर्मान वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू असतात. त्यादृष्टीने या इम्पलांटचा फायदा होणार आहे.

गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम सांध्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूऐवजी आता सिरॅमिकचे मटेरियल वापरण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्य असे की हे मटेरियल रुग्णाच्या आंतरप्रकृतीतील उतीशी साधर्म्य असणारे असल्यामुळे शरीराशी सहज जुळवून घेण्यास मदत करणारे आहे. पर्यायाने अॅलर्जी असणाऱ्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय होयू शकतो. इन्फेक्शनचा धोकाही कमी होऊ शकतो, बऱ्याच वेळा शस्त्रक्रीयेत सिटीस्कॅन, एमआरए सारख्या तपासण्या करताना आर्टिफॅक्ट येतात त्यामुळे निदानात बाधा येऊ शकते. परंतु, या इम्पालंटमुळे अचूकतेमध्ये कोणताही फरक पडत नाही. तसेच रुग्णाच्या शस्त्रक्रियोत्तर हालचालीत सुधारणा, सहजता येऊ शकते. नी सोसायटी स्कोरच्या अभ्यासानुसार रुग्णास वेदना कमी व दैनदिन कामात सुलभता येते असे दिसून आले आहे. या इम्पलांटचे आयुर्मानही इतर इम्पालंटच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

एकंदरीत खुब्याच्या शस्त्रक्रियेबरोबरच गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतही सिरॅमिक इम्पलांटचा पर्याय उपलब्ध झाल्याने रुग्णांना मुख्यतः तरूण वयातील रुग्णांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading