अंतरिम अर्थसंकल्प 2024 : 25 हजार पर्यंतचा थकीत कर परतावा मिळणार, कर प्रणालीत बदल नाही
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज (दि. 1 )लोकसभा निवडणुकां पूर्वीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. आगामी काळात भारताला विकासाच्या दिशेने घेवून जाणारा हा अर्थसंकल्प असेल, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात केली. सुरवातीला मोदी सरकारने मागील दहा वर्षांच्या काळात ज्या योजना राबवल्या त्यांची उजळणी केली. त्यानंतर आगामी काळात मोदी सरकारचा आगामी विकासाचा रोड मॅप सादर केला.
निवडणुका डोळ्या समोर असताना फार मोठ्या घोषणा न करता निर्मला सितारामण यांनी महत्वाच्या व कमी घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केल्या. यामध्ये प्रामुख्याने कर प्रणाली आणि कर परतावा ची घोषणा महत्वाची ठरली. मागील 2010 ते 2014 च्या काळात ज्या नागरिकांना कर परतावे मिळालेले नाही. अन् जे 25 हजार रुपयांपर्यंत असतील ते सर्व परतावे आता करदात्यांना दिले जातील, अशी मोठी घोषणा निर्मला सितारामण यांनी आज केली. त्यामुळे जवळपास 1 कोटी सामान्य करदात्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कर (Tax) प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच मागील वर्षा प्रमाणे यावर्षीही 7 लाखा पर्यंतच्या उत्पन्न हे करमुक्त असणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केलेल्या घोषणा –
- कर प्रणाली मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही
- 7 लाखा पर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही
- ई – बस सेवा सुरू करणार
- मेडिकल कॉलेज उभारणीला प्राधान्य
- कृषी बाजार समित्या डिजीटल करणार
- राज्यांना 75 हजार कोटीचं कर्ज
- पर्यटन विकासाला प्राधान्य
- लक्षद्वीपच्या विकासाला देखील चालना देणार
- युवा उद्योजकांसाठी 1 कोटीचा फंड
- नॅनो डी ए पी चा प्रयोग राबवणार
- मस्य निर्यातीला प्राधान्य
- जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहन रस्त्यावर आणणार
- 3 प्रमुख रेल्वे कॉरीडॉर बनवणार
- पायाभूत सोई सुविधांवर भर देणार 11 कोटींची तरतूद
- डीफेन्स बजेटमध्ये 11.1 कोटींची तरतूद
- येत्या 5 वर्षात 2 कोटी घर उभारणार
- नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.
- लोकसंख्या नियंत्रणांसाठी समिती स्थापन
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगा रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींचे लसीकरण वाढवले जाईल,
