‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या २५व्या आवृत्तीचे प्रकाशन
पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी भूतकाळात अडकून न बसता भविष्याचा वेध घेतला पाहिजे. नैतिकता, जागतिक दृष्टिकोन व सामाजिक बांधिकलकी ही त्रिसुत्रीचा वापर करुन आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. सातत्य, परीश्रमाबरोबर या त्रिसुत्रीचा वापर आपण केला पाहिजे, असे उद्योजकांनी आपल्याला मिळालेल्या दिशा मुलाखतीतून उलगडल्या. ग्रामीण भातून येऊनही जागतिक पातळीवर यश मिळवता येते, असेही यावेळी उद्योजकांनी उदाहरणसह स्पष्ट केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आशिष अचलेरकर यांच्या यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे बुधवारी झाले.
याप्रसंगी ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ६७ वर्षे कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समितीचा मानपत्र देऊन कृतज्ञता गौरव करण्यात आला. हा गौरव विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार व समितीचे विश्र्वस्त व सदस्यांनी स्विकारला. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजंगावकर यावेळी उपस्थित होते.
नवी दिशा शोधून निरनिराळ्या क्षेत्रांत मार्गक्रमण करत उज्ज्वल भारताच्या विकासात बहुमूल्य योगदान देणारे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या सुनंदाताई पवार, तौरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरत गिते, कॉमसेन्स या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील यशस्वी स्टार्टअप कंपनीचे संस्थापक सागर बाबर आणि जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने प्रभावशाली युवा उद्योजिका म्हणून गौरविलेल्या लंडन येथील आर्या तावरे या पाच मराठी यशस्वी शिलेदारांशी डॉ. वासलेकर यांनी त्यांच्या यशस्वी जीवनाची मुलाखत घेतली. नव्या वैचारिक अनुभवाद्वारे त्यांनी आपल जीवन प्रवास उलगडला.
संदीप वासलेकर म्हणाले, लहाणपण अत्यंत हलाखीच्या परिस्थित घालवले. परिस्थितीवर मात करुन आज जगाच्या दाही दिशा फिरत आहे. नियतीला निश्चयाची जोड दिल्यास यशपासून आपल्याला दूर कोणी ठेवू शकत नाही. यश प्राप्त करण्यासाठी आधी निश्चय केला पाहिजे, असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. विविध उदाहरणे देत त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. पाणी प्रश्नावर विचार मांडण्यासाठी मी जगभर फिरत आहे. सध्याचे बदलते तंत्रज्ञानामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण सावधगिरीने वावरणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच जगाला सर्वाधिक धोका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अशिष अचलेकर म्हणाले, यश मिळविण्यासाठी सर्व प्रथम आपल्या मनातील भिती, न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. जगभरात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या प्राप्त करण्याठी आपल्या जिद्द, प्रेरणा निर्माण करा.
कार्यक्रमानंतर संदीप वासलेकर यांनी यशस्वी उद्योजकांनी मुलाखत घेतली. सर्व उद्योजकांनी आपला जीवन प्रवास मुलाखतीतून उलगडला. आईवडीलांच्या आर्शिवाद व यश मिळविण्याची जिद्द यातूनच यश प्राप्त करता आलेत्र. कर्तव्याचे भान ठेवत प्रमाणिकपणे प्रयत्न केल्यास यश शंभर टक्के मिळते. प्रत्येक दिवस शिकण्यासारखा असतो. कृतज्ञता विनम्रता आणि जमिनीश घट्ट नाते ठेवा. स्वतःवरील विश्वास कधीही ढळू देऊ नका असा, असा सल्ला उद्योजकांनी दिला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. तर सुनिल महाजन यांनी आभार मानले.
