Monday, June 1, 2026
ENTERTAINMENTLatest News

आपल्या अद्भुत चमत्काराने दुष्काळावर मात करणार बाळूमामा

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत बाळूमामांच्या अनेक लीला पाहायला मिळतात. येत्या महाएपिसोडमध्ये बाळूमामांची अशीच एक कथा पाहायला मिळणार आहे. बाळूमामा मेंढ्याना घेऊन सतत भ्रमण करत असतात आणि एकदा ते एका दुष्काळग्रस्त भागात जातात. दुष्काळामुळे त्या गावातील लोक गाव सोडून जात असतात. बाळूमामांचे सेवक ही त्यांना त्या गावात थांबण्यास नाही म्हणतात. पण बाळूमामा मात्र या गावात थांबण्यासाठी ठाम असतात. तेव्हाच २ गावकरी मामांकडे येतात आणि त्यांना गावातील परिस्थिती सांगतात व बाळूमामांना त्यांना गावात येण्यासाठी आश्वासन देतात. ही गोष्ट गावातल्या आबाला कळताच तो चवताळतो आणि गावकऱ्यांना धमकावतो. बाळूमामा गावकऱ्यांना त्यांचा एक मेंढा गावात घेऊन जा म्हणतात. आबा या गोष्टीत अनेक अडथळे आणतो पण गावकरी तो मेंढा घेऊन जातात आणि चमत्कार होतो. गावात नेमक काय घडतं हे पाहण्यासाठी नक्की बघा, बाळुमामाच्या नावानं चांगभलं, महारविवार, ४ फेब्रुवारी, दु. २.०० वा. आणि रात्री ८.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading