Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मातोश्री बाहेर मोठा घातपात होणार?

 

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर मोठे कांड करणार आहेत, असा फोन अज्ञात व्यक्तीचा महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला केला आहे. राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर ‘कांड’ होण्याचा फोन येणे अत्यंत गंभीर आहे.

एक व्यक्ती मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करत होती. अशात या व्यक्तीच्या कानावर एक संभाषण पडले. हे संभाषण ऐकून ही व्यक्ती हादरली. जे संभाषण ऐकलं, त्यामुळे या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. हे संभाषण होते, उद्धव ठाकरे यांच्याबाबतचे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या घराबाहेर मोठे कांड करणार असल्याचे या व्यक्तीने ऐकले. ताबडतोब या व्यक्तीने महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला अन् या बाबतची माहिती दिली.

महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करणा-या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणा-या ४ ते ५ मुस्लिम व्यक्तींचे संभाषण ऐकले. या संभाषणातील मुद्दे या व्यक्तीने पोलिसांना कळवले. हे मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते. हे तरुण मोहम्मद अली रोडवर रूम रेंटवर घेणार आहेत, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिस आता सतर्क झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading