Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsPUNE

सावा हेल्थकेअरचे चेअरमन विनोद जाधव यांचा ‘डायमंड ऑफ सिडब्ल्यूआयटीएन पुरस्कारा’ने गौरव 

पुणे :   कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थ्यांची संस्था क्विटेनच्या वतीने देण्यात येणारा ‘डायमंड ऑफ सिडब्ल्यूआयटीएन पुरस्कार’ यंदा सावा हेल्थकेअरचे चेअरमन विनोद रामचंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला. (Sava Healthcare Chairman Vinod Jadhav felicitated with ‘Diamond of CIWITN Award’)


          क्विटेनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी आयोजित कार्यक्रमात कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. अशोक चांडक, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन उद्योजक विनोद जाधव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अनिल शेलार, उपाध्यक्ष मोहन अंतूरकर, उपाध्यक्ष अश्विनी कुलकर्णी, खजिनदार अतुल देवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
          उद्योजक विनोद रामचंद्र जाधव यांनी 1990 मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा मिळवला. 1990 ते 2003 पर्यंत हायड्रॉलिक सिस्टीम, लार्सन अँड टुब्रो, फियाट, मर्सिडीज-बेंझ आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स या उद्योग क्षेत्रात काम केले. त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर 2003 मध्ये फार्मास्युटिकल व्यापार उद्योगात पाऊल टाकत सावा हेल्थकेअर कंपनीची सुरुवात केली. अल्पवाधितच औषध वितरणाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला. आजघडीला भारतभरात सातशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच कंपनीने मॉरिशस, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका आणि बार्बाडोसमध्ये विस्तार केला आहे. विनोद जाधव यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे भारतातील सर्वोत्कृष्ट व्यापार निर्यातदार म्हणून गौरविण्यात आले. 
          व्यवसायातील कौशल्याचे प्रतिबिंब आहेत, सामाजिक उपक्रमांचे आयोजन, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये योगदान दिले आहे. ससून रुग्णालयाला सोयीसुविधा पुरविल्या आहेत. अहमदनगरमध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माध्यमातून 120 खाटांचे वसतिगृह बांधण्यासाठी मोठी मदत केली आहे. विशेषत: UAE तुरुंगातून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठीही मदत केली आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज सारख्या संस्थांकडून पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading