Monday, August 31, 2026
Latest NewsLIFESTYLE

सामाजिक उपक्रमांसाठी ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न

 

पुणे : कशिश प्रॉडक्शन्सच्या वतीने ‘MR, MISS, MRS. GLOBAL MAHARASHTRA’ आणि लहान मुलांसाठी ‘RISING STAR’ या फॅशन शोचे आयोजन आज करण्यात आले होते. या शो मधून जमा झालेला निधी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. या फॅशन शो च्या माध्यमातून  दुर्गम भागातील महिलांना सॅनेटरी  नॅप्किन्स चे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती कशिश प्रॉडक्शन्सचे अध्यक्ष आणि पुण्याचे ‘पॅड मॅन’  योगेश पवार यांनी शो नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती येथे ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न  झाला. याप्रसंगी  ‘पॅड मॅन’  योगेश पवार, दीपाली कांबळे, रूपा पवळे, पीया कोसुंबकर, झहीरा शेख, डॉ स्मिता बारावकर, नम्रता काळे, ओंकार अभ्यांकर,तेजस रायभार, रजत मिरके, रोहित पाटील, अमिता धोपाडे आदि उपस्थित होते. 

फॅशन शो बद्दल योगेश पवार म्हणाले, आम्ही सातत्याने महिलांच्या आरोग्या विषयीचे विविध उपक्रम राबावत असतो. ‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यभरातून आलेल्या एंट्रीज मधून  स्पर्धेसाठी निवड केली होती. सौंदर्य स्पर्धा म्हटंले की सहभागांसाठी अनेक निकष लावले जातात. पण या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय, वजन, ऊंची याचे कोणतेही निकष आम्ही लावत नाही. ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली होती, या Mr, Miss,Mrs. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमार्यादा ठेवण्यात आलेली नव्हती,  तसेच RISING STAR या स्पर्धेत लहान मुळे मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. 

‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’  साठी ज्यूरी म्हणून काशीश फॅशन स्टुडिओ ब्रँड ॲ्बेसेडर वैशाली भारद्वाज, अभिनेता प्रसाद खैरे, अभिनेत्री पूजा वाघ, प्रियांका मिसळ, अल्विरा मोशन च्या दीपाली कांबळे यांनी काम पाहिले. या शो चे असिस्टंट म्हणून अंजली वाघ आणि अर्चना मागाडे यांनी काम पहिले तसेच सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले.

 

‘ग्लोबल महाराष्ट्र फॅशन शो’ मधील विजेते पुढीलप्रमाणे

मुलांचा गट 1 (मुली)
विजेती: कार्तिकी बत्ते
पहिली उपविजेती : अन्विका मोरे
द्वितीय उपविजेता: अघन्या गोसावी

मुलांचा गट 1 (मुले)
विजेता: अद्विक बेहेले
प्रथम उपविजेता: अनिश टाकळीकर
द्वितीय उपविजेता : विनय तायडे

मुलांचा गट 2
विजेती : आर्या कदम
पहिली उपविजेती : प्रश्विता बेहेले
दुसरा उपविजेता: आरव पटेल

मिस
विजेती : साक्षी जाधव
पहिली उपविजेती: तान्या कुडिया
दुसरी उपविजेती: प्राची यादव

मिस्टर
विजेता: सुयोग नगिने
पहिला उपविजेता: हेमंत कुमार
द्वितीय उपविजेता : विशाल माघाडे

मिसेस
विजेती : स्वरदा कुलकर्णी
पहिली उपविजेती : संजीवनी देशमुख
दुसरी उपविजेती: रिंकी जोशी

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading