Monday, August 31, 2026
BusinessLatest News

हिमालय ऑप्टिकलने पुण्यात लाँच केले पहिले स्टोअर

पुणे : भव्य सांस्कृतिक वारसासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे येथे हिमालय ऑप्टिकलने आपल्या १४० व्या स्टोअरचे भव्य उद्घाटन केले आहे. हिमालय ऑप्टिकलची स्थापना १९३५ मध्ये झाली असून तिने देशभरातील ४७ शहरांमध्ये १४० स्टोअर्सचा विस्तार केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या एम. जी. रोडवर असलेल्या तिच्या नवीनतम अद्ययावत स्टोअर चे उद्घाटन पुण्याचे पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी हिमालय ऑप्टिकल चे संचालक देवांश बिनानी, राजा बहादूर मिल्स परिवारातील उमंग पित्ती आणि  वैभव पित्ती सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते. 

हिमालय ऑप्टिकलचे संचालक देवांश बिनानी म्हणाले कीफ्रेम्स व सनग्लासेस च्या विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यात आल्या असून त्यातील प्रत्येक डिझाइन आणि कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित हाय-एंड आयवेअर फॅशन ब्रँडच्या नवीनतम संग्रहांमधून या विशेष ऑफर काळजीपूर्वक तयार केल्या आहेत. हिमालय ऑप्टिकल हे क्रोम हार्ट्सडिटामेबॅकबर्बेरी, ब्वल्गारीडोल्से अँड गब्बानाएम्पोरियो अर्मानीप्राडासाल्व्हाटोर फेरॅगामोटॉम फोर्डगुच्चीव्हर्सेसकेल्विन क्लेनरे- बॅनओकलीवोगटॉमी हिलफिगर आणि इतर अशा ६० हून अधिक प्रतिष्ठित ब्रँड्सचे वैविध्यपूर्ण पर्याय देणारेआलिशान आयवेअरच्या प्रेमींसाठीचे अतुलनीय आश्रयस्थान म्हणून उभे आहे.

हिमालया ऑप्टिकलची आपल्या ग्राहकांच्या आयकेअरच्या सर्वात चौखंदळ गरजा पूर्ण करण्याची कटिबद्धता कायम असून येथे वास्तविक उंची ३६० डिग्री नेत्र चाचणी उपलब्ध आहे. ती तेथील जागतिक दर्जाच्याउच्च- प्रशिक्षित ऑप्टोमेट्रिस्ट्सच्या टीमद्वारे काळजीपूर्वक केली जाते. बिनानी यांनी संरक्षणात्मक आयवेअरचे सखोल महत्त्व आणि नियमित डोळ्यांच्या तपासणीची आवश्यकताविशेषतः योग्य प्रिस्क्रिप्शन सनग्लासेसची वाढती मागणी याविषयी भारतीय बाजारपेठेतील वाढती जागृती अधोरेखित केली. ते म्हणाले८५ वर्षापेक्षा जास्त वर्षांच्या वारसामुळे आमच्या ग्राहकांना डोळ्यांच्या काळजीबद्दल जागृत करण्याची आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार टेलर मेड  उपाय ऑफर करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो.” तसेच त्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रात सुमारे १० लक्झरी-केंद्रित स्टोअर्स उघडण्याच्या योजनेची घोषणा केली. उमंग पित्ती यांनी पुढे सांगितले कीपुण्यातच लक्झरी आयवेअरचे सर्वात मोठे कलेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे पुणेकरांना लक्झरी आयवेअरसाठी मुंबई आणि इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading