Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे अजित पवारांवर थेट आरोप; माझ्यामुळे ‘ती’ जागा वाचली वाचली  

पुणे : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या आत्मचरित्रात  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी  2010 मध्ये पोलीस दलाची तीन एकर जागा एका बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला आहे. यावरून अनेक आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. यावर आज मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेवून आपली बाजू स्पष्ट केली. तसेच अजित पवार यांनी येरवडा येथील पोलीस दलाची जागा हस्तांतरांसाठी दबाव टाकला होता; मात्र मी विरोध केल्याने ती जागा वाचली. नाहीतर ही जागा खाजगी बांधकाम व्यावसाईकांच्या घशात गेली असती, असे बोरवणकर म्हणाल्या.

नोटीस पाठवायची तर पाठवा; मी ही तयार आहे 

मीरा बोरवणकर म्हणाल्या, माझ्या ‘मॅडन कमिशनर’ ( Madden Commissioner) या आत्मचरित्रात अनेक लेख आहेत. त्यातील एका लेखात अजित पवार यांच नाव न घेता जागा हस्तांतरांच्या प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. मात्र, माझ पुस्तक निट न वाचता माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. जर कोणी मला यावरून मानहाणीची नोटीस पाठवत असेल तर मी ही तयार आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, शासकीय जागांवर राजकारण्यांची नजर असतेच. माझ्याकडे जेव्हा हा जमीन हस्ताराचा प्रस्ताव आला तेव्हा अजित पवारांनी विभागीय आयुक्तांना हाताशी धरून जमिनीचा व्यवहार जवळपास पूर्ण केला होता. तेव्हा मी ही गोष्ट तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) यांच्या कानावर घातली त्यानंतर त्यांनी हा व्यवहार रद्द केला. हा व्यवहार योग्य असता  तर माझ्या आधी सत्यपाल सिंह हे पुण्याचे पोलिस आयुक्त होते. मग त्यांनी ती जमीन हस्तांतरीत का केली नाही? असा सवाल देखील बोरवणकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आपण विरोध केला नसतं तर ही जागा खाजगी बांधकाम व्यावसाईकांच्या घशात गेली असती.

.. . म्हणून माझ्यावर येरवडा कारागृहाची जबाबदारी देण्यात आली 

माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर म्हणाल्या, मुंबई येथील कार्यकाळाचे काही दिवस बाकी असताना आता कुटूंबासोबत राहता यावे म्हणून मला पुण्यात बदली करून घ्यायची होती. काही दिवसांनी मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी बदली हवी आहे, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर आपण सी आय डी पुणे मधे बदली करण्याची मागणी केली. मात्र काही दिवसांनी स्वतः मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला अन् ‘सीआयडी’मध्ये तुमची बदली करता येणार नाही असं सांगितले. सध्या ‘सीआयडी’कडे पुण्यातील मोठ्या बिल्डरांच्या अर्बन सिलिंग एक्ट मधील अनेक गंभीर प्रकरणं तापासाठी असल्याने तुम्हाला ‘सीआयडी’मध्ये पाठवण्यास अजित पवारांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बोरवणकर यांनी येरवडा कारागृहाची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त पदावरून माझी येरवडा कारागृहात बदली करण्यात आली, असा खुलासा बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading