Wednesday, April 1, 2026

Day: October 27, 2023

Latest NewsPUNE

युरोकिड्सने शानदार नवरात्री सोहळा आयोजित करून लहान मुलांच्या मनांमध्ये सांस्कृतिक जागरूकतेची ज्योत पेटवली

पुणे: भारतातील सर्वात जास्त विश्वसनीय प्रीस्कूल ब्रँड युरोकिड्स प्रीस्कूलने मनमोहक नृत्य, रंगीबेरंगी कपडे आणि सांस्कृतिक समृद्धतेचा सण नवरात्र अतिशय उत्साहाने साजरा केला. लहानग्यांच्या मनांमध्ये एकता, संस्कृतीविषयी आवड आणि परंपरांच्या जाणिवांची मूल्ये रुजवण्याची बांधिलकी युरोकिड्स ब्रँडने अधोरेखित केली. ७० पेक्षा जास्त सेंटर्समधील ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सोहळ्यात अतिशय उत्साहाने भाग घेतला, प्राचीन परंपरा जपण्यावर भर दिला आणि उद्याच्या नव्या पिढीच्या उभारणीचा पाया घट्ट केला. प्रीस्कूल शिक्षणाविषयीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी नावाजल्या जाणाऱ्या युरोकिड्सने या आनंददायी सोहळ्यामध्ये संस्कृतीशी जवळीक आणि लहान वयातील शिक्षण यांची यशस्वी सांगड घातली. नऊ दिवसांचा सण नवरात्र देवी दुर्गेच्या नऊ दैवी रूपांचा सन्मान आहे, वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंद म्हणून साजरा केला जाणारा हा सण, परंपरा, भक्ती आणि एकता यांचा संगम घडवून आणतो. सांस्कृतिक पाळेमुळे लहान वयापासूनच रुजवली जाणे महत्त्वाचे असते हे युरोकिड्सने ओळखले आहे आणि म्हणूनच मूल्ये जतन करून भविष्याला आकार देण्यात युरोकिड्स महत्त्वाची भूमिका बजावत असते. शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि आकलनात्मक विकासाला चालना देऊन मुलांचा सर्वसमावेशक विकास साध्य करण्यात युरोकिड्स अग्रेसर आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून युरोकिड्सने नवरात्र साजरी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मुलांना सांस्कृतिक वारशाची ओळख करून घेता आली आणि सणाचा आनंद घेता आला. लहान मुलांना सहज खेळता येईल असा गरबा, दांडिया डान्स सेशन्स अशा कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता, लहान वयाला साजेसे संगीत व सजावट करण्यात आली होती. नवरात्र थीम असलेले प्रॉप्स असलेला फोटो बूथ ठेवण्यात आला होता, ज्यामुळे मुलांचा आनंद फोटोंमध्ये अनोख्या पद्धतीने कॅप्चर करता आला. चनिया चोली, कुर्ता धोती यासारख्या पारंपरिक कपड्यांमध्ये मुलांनी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते, सांस्कृतिक अनोखेपण त्यामधून दर्शवण्यात आले. लहान मुलांना करता येईल अशी नवरात्र पूजा आणि आरती देखील शाळेच्या परिसरात करण्यात आली. सांस्कृतिक आणि क्षेत्रीय सीमा ओलांडून, एकता व भक्तीच्या भावनेवर भर दिला गेला. या कार्यक्रमांमुळे मुलांची नवरात्रीविषयीची आणि त्यातून शिकवल्या गेलेल्या मूल्यांविषयीची समज अधिक समृद्ध झाली. लाईटहाऊस लर्निंग (युरोकिड्स)चे प्रीके डिव्हिजनचे सीईओ श्री केव्हीएस शेषसाई यांनी सांगितले, “आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतो, ज्यामध्ये सांस्कृतिक जागरूकता आणि कौतुकाचा समावेश असतो. नवरात्र सोहळा मुलांना आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरांचे महत्त्व आणि एकता आणि सौहार्दाच्या मूल्यांबद्दल शिक्षण देण्याची एक उत्कृष्ट संधी ठरली. हा सण आपल्या मुलांना धार्मिकता, नैतिकता आणि सशक्तीकरण यासारखे जीवनाचे धडे देतो. असे अर्थपूर्ण सण साजरे करून भावी पिढीमध्ये ही आवश्यक मूल्ये रुजवण्यासाठी युरोकिड्स वचनबद्ध आहे.” मुक्त विचारांच्या, सहानुभूतीशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक व्यक्ती घडवण्यासाठी मुलांना लहान वयातच विविधतेतील एकतेची शिकवण देणे आवश्यक असल्याचे युरोकिड्स मानते. हे विचार खऱ्या अर्थाने नवरात्र सोहळ्यामध्ये साकार होतात. शिक्षणाच्या विविध क्षेत्रांवर भर देणाऱ्या युनोइया या सुनियोजित अभ्यासक्रमासह युरोकिड्स प्रत्येक मुलाला सर्वांगीण विकासाचा अनुभव प्रदान करते, असा अनुभव जो भविष्यातील पिढ्यांना सक्षम बनवतो.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात न्यायमूर्ती  शिंदे समितीला मुदतवाढ

मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी

Read More
Latest NewsSports

प्रसाद सस्ते आणि समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड

पिंपरी : पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड कुस्ती चाचणी स्पर्धेत पै. प्रसाद सस्ते आणि

Read More
Latest NewsMAHARASHTRA

देशात व राज्यात मुस्लिमांचे राजकीय प्रतिनिधित्व निराशाजनक : अब्दुर रहमान

भिवंडी : देशात मुस्लिमांची संख्या १४.२ टक्के आहे. लाेकशाहीने देशात मुस्लिमांना त्यांच्या मागण्या, हक्क मांडता व त्यांची राजकारणात प्रतिनिधित्व वाढावे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ठाणे  :- ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी शासकीय इतमामात हजारो

Read More
Latest NewsPUNE

११ व्या तालचक्र महोत्सवाला दिमाखात प्रारंभ; युवा वादक आणि गायकांचे लयदार सादरीकरण

पुणे : युवा वादकांचे दमदार तबलावादन आणि कंठ संगीतातील आश्वासक सादरीकरणाने ११ व्या ‘तालचक्र महोत्सवा’ला शुक्रवारी लयदार प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या

Read More
BusinessLatest News

महाराष्ट्र राज्यातील 64 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात घडवून आणला सकारात्मक बदल

पुणे: एचडीएफसी बँकने त्यांच्या सीएसआर ब्रँड परिवर्तन अंतर्गत, जाहीर केले की त्यांनी महाराष्ट्र राज्यातील 64 लाखांहून अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून

Read More
Latest NewsMAHARASHTRA

बावनकुळे यांनी घेतली तारपावादक भिकल्या धिंडाची भेट

पालघर :जव्हार तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या काशिवली या गावी आज, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा

Read More
Latest NewsPUNE

मराठा क्रांती मोर्चा कडून मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

पुणे :  मराठा क्रांती मोर्चा कडून हिंगणे खुर्द वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे येथे आज सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत

Read More
Latest NewsPUNE

विकास आराखडा रखडल्याने ३४ गावात बकालीकरण -हवेली कृती समितीचा आंदोलनांचा निर्धार

  पुणे:विकास आराखडा रखडल्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या ३४ गावांचे वीज, कचरा,पाणी, रस्ते ,ड्रेनेज अशा मुलभूत सुविधां अभावी बकालीकरण

Read More
Latest NewsPUNE

प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा! चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरी समस्या तातडीने सोडवा, अशी सूचना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केली.

Read More
Latest NewsPUNE

भिमा कोरेगाव शौर्यदिन नियोजनाबाबत बैठक १ नोव्हेंबरला

पुणे : 1 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन नियोजनाच्या अनुषंगाने , या उत्सवाशी संबंधित सर्वच व्यक्ती , संस्था

Read More
ENTERTAINMENTLatest News

झी मराठी अवॉर्ड मध्ये माधुरी दीक्षित आणि मलायकाची मराठमोळी अदा !

मलायकाचा परफॉर्मन्स फाडू, सलील दादाला मिळेल का तिच्या हातचा लाडू? झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी

Read More
ENTERTAINMENTLatest News

वीरूसंगे प्राजक्ताच्या पैलवानकीचा प्रवास सुरू!

एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘तुजं माजं सपान’ ही सोनी मराठीवरील मालिका. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथ, या मालिकेला उजवं ठरवते. क्षेत्र मग ते कुठलंही असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्यं यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. हीच बाब वेटक्लाउड या निर्मितिसंस्थेची सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुजं माजं सपान’ ही मालिका अधोरेखित करते आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पहिलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा, सोम. ते शनि. संध्या. ७.०० वा., ‘तुजं माजं सपान’ या मालिकेमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. वीरू पहिलवानासोबत लग्न करून शिराळकरांच्या घरात सून म्हणून प्रवेश करणारी प्राजक्ता लग्नानंतर आपल्या स्वप्नांना विसरून संसारात रमली खरी, पण तिचं स्वप्न तिच्यापेक्षा जास्त वीरूला छळतंय. संसाराच्या गाड्यला जुंपून न घेता कुस्तीगीर बनण्याचं आपलं स्वप्न प्राजक्तानं पूर्ण करावं त्यासाठी एक नवरा म्हणून तसेच एक नामांकित कुस्तीगीर म्हणून वीरू आपल्यापरीने प्राजक्ताला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आईच्या जुनाट विचारांना न जुमानता,  आईच्या रोषाला सामोरं जाऊन वीरू प्राजक्ताला कुस्ती खेळण्याचं आव्हान देतो. तिच्या पैलवानकीच्या प्रवासात साथ देण्याचं वचनही देतो, पण प्राजक्ता वीरूचं मन राखू शकेल का..? वीरू प्राजक्ताला पुन्हा तालमीत आणू शकेल का..? समाजानं बांधून दिलेल्या चौकटीत प्राजक्ता आपल्या स्वप्नांना तिलांजली देईल की वीरूच्या साथीने पुन्हा तालमीत धुरळा उडवेल..? तुमच्याही मनात असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं असेल, हे सगळं आता मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेचा विशेष महाएपिसोड २९ ऑक्टोबर रोजी संद्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे, ‘तुजं माजं सपान’ ही मालिका पाहायलाच हवी, फक्त आणि फक्त सोनी मराठी वाहिनीवर. वीरू आणि प्राजक्ता याचा ‘तुजं माजं सपान’पासून आपल्या दोघांचं सपानपर्यंतचा हा नवा प्रवास नक्कीच पाहण्याजोगा

Read More
Latest NewsPUNE

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

पुणे : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार याद्या

Read More
Latest NewsTECHNOLOGY

वी आयओटी डिव्हाईस इंटरऑपरेबिलिटी टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनसाठी सी-डॉटच्या सहयोगाने प्रस्तुत करत आहे आईओटी लॅब-ऍज-अ-सर्व्हिस

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आयओटी स्वीकारामधील वृद्धीसह इंडस्ट्री ४.० क्रांतीमध्ये आघाडीवर आहे. सर्व क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर आयओटी प्रथांचा स्वीकार करत आहेत. नॅसकॉमच्या अहवालानुसार, भारतातील आयओटी बाजारपेठ २०२५ सालापर्यंत १५ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचेल. पण उद्योगक्षेत्राला डिव्हाईस नेटवर्क कॉम्पॅटिबिलिटी, रिमोट डिव्हाईस कॉन्फिगरेशन इत्यादी ऑपरेशनल आव्हाने आणि व्यवसायांच्या वाढीमध्ये बाधा निर्माण करणारी फ्रॅगमेंटेड इकोसिस्टिम यासारखी आव्हाने सहन करावी लागतात. या समस्येवर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने आयओटी डिव्हायसेसच्या इंटरऑपरेबिलिटीसाठी नॅशनल आयओटी स्टँडर्ड्स म्हणून वनएम२एम निश्चित केले आहे.   आयओटी विभागातील आघाडीची कंपनी आणि भारतात आयओटीच्या स्वीकाराचा वेग वाढवण्याच्या भारत सरकारच्या मिशनचे समर्पित भागीदार या नात्याने, आघाडीची टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने (वी) सी–डॉटच्या (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) सहयोगाने आयओटी लॅब प्रस्तुत केली आहे.  ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा असून आयओटी इकोसिस्टिममध्ये स्टँडर्डायझेशन व इंटरऑपरेबिलिटीला प्रोत्साहन देण्याचे  एकसमान व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ती प्रस्तुत केली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये आयओटी लॅब तयार करण्यात आल्यापासून आम्ही ऑटोमोबाईल, युटिलिटी, बीएफएसआय, लॉजिस्टिक्स आणि इतर अनेक उद्योगक्षेत्रांमधील ५० पेक्षा जास्त डिव्हायसेसचे टेस्टिंग केले आहे. बीआयएसने आयओटी सोल्युशन डिझाईनसाठी नॅशनल स्टॅंडर्ड म्हणून स्वीकारण्यात आलेल्या वनएम२एम स्टँडर्ड्सच्या प्रॉलिफरेशनला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यानुसार लॅब टेस्ट्स करण्यात येतात आणि वनएम२एम स्टँडर्ड्ससोबत कॉम्पॅटिबिलिटी देखील प्रमाणित केली जाते. थोडक्यात ही आयओटी लॅब डिव्हाईसनुसार नेटवर्क परफॉर्मन्सची वैधता ठरवते, इतकेच नव्हे तर, सोल्युशन इंटरऑपरेबिलिटी प्रमाणित करण्यात देखील मदत करते.   वोडाफोन आयडियाचा एंटरप्राइज विभाग, वी बिझनेसचा लॅब–ऍज–अ–सर्व्हिस उपक्रम, १७५ पेक्षा जास्त परिस्थिती टेस्ट करण्यासाठी सक्षम आहे, ज्यामध्ये नेटवर्क आणि फंक्शनल टेस्टिंग, फील्ड टेस्टिंग, ऍप्लिकेशन टेस्टिंग, कॉम्पॅटिबिलिटी टेस्टिंग, वनएम२एम स्टॅंडर्ड टेस्टिंग आणि अनेकांचा समावेश होतो. यामध्ये एएमआय, कनेक्टेड कार, पीओएस, व्हीटीएस आणि इतर अनेक उद्योगक्षेत्रांमधील ३० पेक्षा जास्त विविध यूज केसेसचे देखील टेस्टिंग केले जाऊ शकते. या लॅबमध्ये डिव्हाईस, मोड्यूल्स, एसआयएम, ऍप्लिकेशन, फर्मवेयर आणि इतर अनेक इकोसिस्टिम कम्पोनंट्सच्या विशाल श्रेणीचे टेस्टिंग करण्याची क्षमता आहे.   ही लॅब एक आयओटी इकोसिस्टिम ऑर्केस्ट्रेटर म्हणून काम करते आणि अखंडित आयओटी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी सर्व हितधारकांना एकत्र आणते. वी सी–डॉट आयओटी लॅब एक एक्झॉस्टिव्ह टेस्ट सर्व डिव्हायसेसवर चालवते आणि कंपोनंट डिझायनर्ससोबत समन्वय साधून हे सुनिश्चित करते की, कोणत्याही बगचे निराकरण करणे शिल्लक राहणार नाही. आजवर ५ डिव्हायसेसना या लॅबने “नेटवर्क रेडी” म्हणून प्रमाणित केले आहे. आता वी सी–डॉट आयओटी लॅब ५जी आणि एनबीआयओटी डिव्हायसेसचे देखील टेस्टिंग करत आहे.    भारतातील आयओटी इकोसिस्टिमचे जतन करण्यासाठी वी आयओटी लॅब करत असलेल्या प्रयत्नांबाबत वी चे चीफ एंटरप्राइज बिझनेस ऑफिसर श्री. अरविंद नेवतीया यांनी सांगितले, “आयओटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून वी आयओटीचा सर्व क्षेत्रांमध्ये स्वीकार केला जावा यासाठी वचनबद्ध आहे. आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की, वी आयओटी लॅबने सी–डॉटच्या सहयोगाने आपल्या भागीदारांना आयओटी तैनात करण्याचा अधिकार देऊन सक्षम बनवले आहे, खासकरून त्यांनी स्टँडर्डायझेशन आणि इंटरऑपरेबिलिटी आणली आहे. ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन‘ स्थापन करून ही भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत कारण त्यामुळे स्टार्टअप्स व एम२एम/आयओटी उद्योगक्षेत्राच्या सिनर्जी एकत्र आणल्या जातील. हा समन्वय म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीमध्ये योगदान देत असताना देशांतर्गत आयओटी इकोसिस्टिममध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.”   हे सर्टिफिकेशन आयओटी सेवा पुरवठादारांना पुढील लाभ मिळवून देते – ·         ग्लोबल स्टँडर्ड्सचे अनुपालन करता येते, त्यामुळे अधिक वेगाने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येते आणि मिळकत देखील लवकर सुरु होते. ·         वनएम२एम स्टँडर्ड्सनुसार इंटरऑपरेबिलिटी आणि स्टँडर्डायजेशन सुनिश्चित करण्यात आल्याने आयओटी सेवा पुरवठादार व त्याच्या डिव्हाईसची विश्वसनीयता वाढते. याखेरीज वीसीडॉट भागीदारी भारतामध्ये आयओटी इकोसिस्टिमचे जतन करत आहे आणि ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन‘ म्हणून वी आयओटी लॅबचा विस्तार करून आयओटी एम२एम क्षेत्रात स्टार्टअप्सना सक्षम बनवत आहे. हे इन्क्युबेशन सेंटर म्हणून काम करेल, स्टार्टअप्सना जास्तीत जास्त मोठ्या बाजारपेठेसाठी अधिक वेगाने तयार करण्यासाठी तंत्रज्ञान व बिझनेस प्लॅटफॉर्म पुरवेल. सोल्युशन्सना वनएम२एम स्टँडर्ड्सचे अनुपालन करण्यायोग्य बनवण्यासाठी हे सेंटर एक प्लॅटफॉर्म पुरवेल. सीडॉटचे सीईओ डॉ राजकुमार उपाध्याय यांनी सांगितले, “स्टँडर्ड्सचे अनुपालन करणाऱ्या आयओटी डिव्हायसेस आणि ऍप्लिकेशन्ससाठी टेस्टिंग व सर्टिफिकेशन फ्रेमवर्क स्थापन करण्यासाठी वी सी–डॉट आयओटी लॅब हे खूप मोठी भरारी आहे. मला खात्री आहे की, सीडॉट आणि वी यांचा हा समन्वय उपक्रम तसेच सी–डॉटकडून आयओटी/एम२एमसाठी सेंटर ऑफ इनोव्हेशन हे भारतीय उद्योगक्षेत्रासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, खासकरून स्टार्टअप्सना स्वदेशी, स्टँडर्ड्सचे अनुपालन करणारी डिव्हायसेस व ऍप्लिकेशन्स बनवून, तैनात करण्यासाठी खूप लाभदायक ठरेल.” नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयोजित केल्या जाणार असलेल्या, आगामी इंडिया मोबाईल काँग्रेस २०२३ मध्ये वी सीडॉटच्या सहयोगाने वी आयओटी लॅब सर्व्हिस प्रदर्शित करणार आहे. आयएमसी २०२३ ला भेट देणाऱ्यांनी हॉल–५, स्टॉल–५.१ येथे वी बूथला भेट देऊन सेवेचा एक्सक्लुसिव्ह प्रीव्ह्यू अवश्य पहावा.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मातृभूमिविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर महत्वाचा –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळा सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू मानून केंद्र आणि राज्य शासन काम

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

The New Health Report : अधिक चांगले आरोग्य विमा कव्हरेज लक्झरी गोष्टींचा त्याग करण्यासाठी पुणेकर तयार.

पुणे : कोविड-१९ साथीमुळे संपूर्ण जगभरात घडून आलेल्या बदलांमुळे आरोग्याबाबत जागरूक जीवनपद्धतीला प्राधान्य देण्याचे महत्त्व सर्वांनाच ठळकपणे जाणवू लागले आहे.

Read More
BusinessLatest News

टाटा क्लिक पॅलेटच्या सीझन ऑफ स्पार्कल सेलमध्ये मनोसोक्त खरेदी करा, सौंदर्य आणि सणांचा आनंद द्विगुणित करा

 भारताचे ब्युटी मॅचमेकर आणि टाटा समूहातील एक सदस्य, टाटा क्लिक पॅलेटवर साजरा केला जाणार आहे ‘सीझन ऑफ स्पार्कल’ सेल, वर्षातील सर्वात मोठ्या सणांसाठी टाटा क्लिक पॅलेटने २८ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या खास ‘सीझन ऑफ स्पार्कल’ सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये सर्व सौंदर्यप्रेमींसाठी अनेक ग्लोबल आणि भारतीय ब्युटी ब्रँड्सवर अतुलनीय ऑफर्स आणि स्वतःसाठी परफेक्ट ब्युटी मॅच मिळवण्याची संधी दिली जात आहे. टाटा क्लिकचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर  गोपाल अस्थाना यांनी सांगितले, “ग्राहकांना स्वतःसाठी परफेक्ट ब्युटी मॅच शोधण्यात सक्षम बनवण्यासाठी टाटा क्लिक पॅलेट वचनबद्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर ब्युटी ब्रँड्सची विशाल श्रेणी प्रस्तुत करण्याबरोबरीनेच आमची अत्याधुनिक एआय सक्षम ब्युटी आयडी टेक्नॉलॉजी प्रत्येक ग्राहकाचा अनुभव पर्सनलाईज करते जेणेकरून त्यांच्या सौंदर्यविषयक गरजा पूर्ण होऊ शकतील. हा सणासुदीचा काळ अजून जास्त शानदार करण्यासाठी सीझन ऑफ स्पार्कल सेलची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. याची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून होत आहे. आजवर कधीही न पाहिलेल्या ऑफर्ससह, टाटा क्लिक पॅलेटचा सीझन ऑफ स्पार्कल सेल प्रत्येक ग्राहकाला मनोसोक्त खरेदी करण्याची शानदार संधी देतो, मग ती खरेदी स्वतःसाठी असो किंवा प्रियजनांसाठी असो. आम्ही असे मानतो की, फेस्टिव्ह सीझन खूप छान असेल आणि आम्ही आमच्या ग्राहकांना प्रगत ब्युटी अनुभव प्रदान करत राहू.” ५०% पर्यंतच्या डिस्काउंटचा लाभ घेऊन या सेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकाल ब्युटी आणि पर्सनल केयरमधील १००० पेक्षा जास्त प्रसिद्ध ब्रँड्सची अनेक ब्युटी उत्पादने आणि मिळवू शकाल शानदार ब्युटी लूक! मेकअप इसेन्शियल्समधील आपल्या पसंतीची उत्पादने टाटा क्लिक पॅलेटवर सहज खरेदी करता येतील कारण इथे कलरबार, डेली लाईफ, फॉरेव्हर५२, लॅक्मे आणि मेकअप रेवोल्युशन यासारख्या ब्रँड्सवर मिळत आहे ५०% पर्यंतची सूट. याखेरीज, शुगर कॉस्मेटिक्ससारख्या ब्रँड्सवर मिळत आहे ६०% पर्यंतची सूट. स्किनकेयरमध्ये बायोटिक, न्यूट्रोजेना, ओले आणि पॉन्ड्सवर १५ ते ३०% पर्यंतची सूट दिली जात आहे. गेस, जग्वार, नॉटिका आणि स्किन बाय टायटनवर ४५% पर्यंतची सूट मिळवून तुम्ही तुमचे फ्रॅग्रन्स कलेक्शन सहज अपग्रेड करू शकाल. डव्ह, जीके हेयर, स्च्वार्जकॉप्फ़ प्रोफेशन, स्ट्रीक्स आणि ट्रेसमे यासारख्या प्रसिद्ध हेयर केयर आणि हेयर कलर उत्पादनांवर ४५% पर्यंतची सूट मिळेल. तुम्ही तुमचे शॉवर रेजिम जर बदलू इच्छित असाल तर डव्ह, ममाअर्थ, निविया, द लव्ह कंपनी आणि व्हॅसलिनच्या बाथ अँड बॉडी इसेन्शियल्सवर या सेलमध्ये ५०% पर्यंतची सूट मिळेल. द मॅन कंपनी, बॉम्बे शेविंग कंपनी आणि उस्तराची मेन्स ग्रूमिंग उत्पादने ४०% पर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करता येतील. लक्झरी ब्युटी सेक्शनमध्ये अनस्तास्या बेवर्ली हिल्स, बॉबी ब्राउन, एम.ए.सी., सिग्मा ब्यूटी आणि अनेक लक्झरी मेकअप उत्पादने आकर्षक किमतींना, खात्रीशीर भेटवस्तूंसह मिळतील. कॉसआरएक्स, द बॉडी शॉप आणि द फेस शॉपची स्किनकेयर उत्पादने अभूतपूर्व किमतींना मिळतील. दक्षिण कोरियायी स्किनकेयर ब्रँड गॅलिनीची उत्पादने सरसकट ८०% डिस्काउंटसह, अविश्वसनीय किमतींना खरेदी केली जाऊ शकतील. चोपार्ड आणि फेर्रागमो यासारख्या लोकप्रिय फ्रॅग्रन्स ब्रँड्सच्या उत्पादनांवर अनुक्रमे २५% आणि ४५% पर्यंतची सूट मिळेल. ओलाप्लेक्स आणि लॉरियल पॅरिस यासारख्या हेयरकेयर ब्रँड्सवर देखील आकर्षक ऑफर्स दिल्या जातील. हा सेल अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी अनेक मोठ्या बँका देखील यामध्ये सहभागी होत आहेत. आयसीआयसीआय आणि कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डांवर १०% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ मिळवता येईल. *नियम व अटी लागू आहेत.

Read More