Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

युरोकिड्सने शानदार नवरात्री सोहळा आयोजित करून लहान मुलांच्या मनांमध्ये सांस्कृतिक जागरूकतेची ज्योत पेटवली

पुणे: भारतातील सर्वात जास्त विश्वसनीय प्रीस्कूल ब्रँड युरोकिड्स प्रीस्कूलने मनमोहक नृत्य, रंगीबेरंगी कपडे आणि सांस्कृतिक समृद्धतेचा सण नवरात्र अतिशय उत्साहाने साजरा केला. लहानग्यांच्या मनांमध्ये एकता, संस्कृतीविषयी आवड आणि परंपरांच्या जाणिवांची मूल्ये रुजवण्याची बांधिलकी युरोकिड्स ब्रँडने अधोरेखित केली. ७० पेक्षा जास्त सेंटर्समधील ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सोहळ्यात अतिशय उत्साहाने भाग घेतला, प्राचीन परंपरा जपण्यावर भर दिला आणि उद्याच्या नव्या पिढीच्या उभारणीचा पाया घट्ट केला. प्रीस्कूल शिक्षणाविषयीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी नावाजल्या जाणाऱ्या युरोकिड्सने या आनंददायी सोहळ्यामध्ये संस्कृतीशी जवळीक आणि लहान वयातील शिक्षण यांची यशस्वी सांगड घातली.

नऊ दिवसांचा सण नवरात्र देवी दुर्गेच्या नऊ दैवी रूपांचा सन्मान आहे, वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंद म्हणून साजरा केला जाणारा हा सण, परंपरा, भक्ती आणि एकता यांचा संगम घडवून आणतो. सांस्कृतिक पाळेमुळे लहान वयापासूनच रुजवली जाणे महत्त्वाचे असते हे युरोकिड्सने ओळखले आहे आणि म्हणूनच मूल्ये जतन करून भविष्याला आकार देण्यात युरोकिड्स महत्त्वाची भूमिका बजावत असते. शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि आकलनात्मक विकासाला चालना देऊन मुलांचा सर्वसमावेशक विकास साध्य करण्यात युरोकिड्स अग्रेसर आहे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून युरोकिड्सने नवरात्र साजरी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये मुलांना सांस्कृतिक वारशाची ओळख करून घेता आली आणि सणाचा आनंद घेता आला.

लहान मुलांना सहज खेळता येईल असा गरबा, दांडिया डान्स सेशन्स अशा कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता, लहान वयाला साजेसे संगीत व सजावट करण्यात आली होती. नवरात्र थीम असलेले प्रॉप्स असलेला फोटो बूथ ठेवण्यात आला होता, ज्यामुळे मुलांचा आनंद फोटोंमध्ये अनोख्या पद्धतीने कॅप्चर करता आला. चनिया चोली, कुर्ता धोती यासारख्या पारंपरिक कपड्यांमध्ये मुलांनी यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते, सांस्कृतिक अनोखेपण त्यामधून दर्शवण्यात आले. लहान मुलांना करता येईल अशी नवरात्र पूजा आणि आरती देखील शाळेच्या परिसरात करण्यात आली. सांस्कृतिक आणि क्षेत्रीय सीमा ओलांडून, एकता व भक्तीच्या भावनेवर भर दिला गेला. या कार्यक्रमांमुळे मुलांची नवरात्रीविषयीची आणि त्यातून शिकवल्या गेलेल्या मूल्यांविषयीची समज अधिक समृद्ध झाली.

लाईटहाऊस लर्निंग (युरोकिड्स)चे प्रीके डिव्हिजनचे सीईओ श्री केव्हीएस शेषसाई यांनी सांगितले, “आम्ही मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतो, ज्यामध्ये सांस्कृतिक जागरूकता आणि कौतुकाचा समावेश असतो. नवरात्र सोहळा मुलांना आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरांचे महत्त्व आणि एकता आणि सौहार्दाच्या मूल्यांबद्दल शिक्षण देण्याची एक उत्कृष्ट संधी ठरली. हा सण आपल्या मुलांना धार्मिकता, नैतिकता आणि सशक्तीकरण यासारखे जीवनाचे धडे देतो. असे अर्थपूर्ण सण साजरे करून भावी पिढीमध्ये ही आवश्यक मूल्ये रुजवण्यासाठी युरोकिड्स वचनबद्ध आहे.”

मुक्त विचारांच्या, सहानुभूतीशील आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक व्यक्ती घडवण्यासाठी मुलांना लहान वयातच विविधतेतील एकतेची शिकवण देणे आवश्यक असल्याचे युरोकिड्स मानते. हे विचार खऱ्या अर्थाने नवरात्र सोहळ्यामध्ये साकार होतात. शिक्षणाच्या विविध क्षेत्रांवर भर देणाऱ्या युनोइया या सुनियोजित अभ्यासक्रमासह युरोकिड्स प्रत्येक मुलाला सर्वांगीण विकासाचा अनुभव प्रदान करते, असा अनुभव जो भविष्यातील पिढ्यांना सक्षम बनवतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading