Wednesday, June 10, 2026

Day: October 11, 2023

BusinessLatest News

फेरेरो इंडिया तर्फे प्रथमच किंडर शोको-बॉन्स क्रिस्पी: या बाँडिंग चा आनंद वाढवणार्‍या चविष्ट ट्रीटची सुरुवात

मुंबई – फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फेरेरो ग्रुप हा जगभरांतील आघाडीचा चॉकलेट आणि कन्फेक्शनरी उत्पादनांचे उत्पादन करणारा ग्रुप असून

Read More
ENGLISH

Tiger roars at the Cricket World Cup to create historic reach for the YRF Spy Universe film!

Tiger roars at the Cricket World Cup to create historic reach for the YRF Spy Universe film!

Read More
Latest NewsNATIONAL

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या पहिल्या सत्रात सहभागी होणार ८५ जागतिक स्टार्स

पुणे – सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (आयएसआरएल) या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जागतिक पातळीवर ८५ सुपरक्रॉस स्टार्स आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असल्याची घोषणा आयएसआरएलने केली. या लीगसाठी फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया भागीदार आहे. या जागतिक स्टार्समुळे पहिले सत्र मोटर स्पोर्ट्स चाहत्यांसाठी रोमांचकारी आणि अविस्मरणीय ठरणार आहे. भारतात जागतिक दर्जाची सर्धा घेण्याचे उद्दिष्ट सीएट आयएसआरएलचे होते. या जागतिक स्पर्धकांच्या सहभागाने ते पूर्णत्वास येत आहे. या स्पर्धेला जगभरातील रायडर्स भरघोस प्रतिसाद देत आहेत. अमेरिका, स्पेन, फ्रान्स, थायलंड, इंडोनेशिया, जर्मनी, स्वीडन, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा विविध देशातील हे ८५ रायडर्स आहेत. या विविध प्रकारच्या निपुण रायडर्समुळे संघ मालकाला आपल्या स्वप्नातील संघ तयार करण्याची संधी मिळणार आहे. जगभरातील रायडर्स सहभागी होत असल्याने संघ मालकांना निवड करण्याची मोठी संधी आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील नैपुण्य यांचा मिलाप संघ मालकांना करता येणार आहे. निवडीतील या स्वातंत्र्यामुळे या लीगला वेगळा आयाम मिळणार असून त्यातून रोमांचकारी रेसिंग अनुभवही चाहत्यांना घेता येणार आहे. शिवाय संपूर्ण सत्रात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. आयएसआरएलसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असून लिलावातही त्याचा प्रत्यय येणार आहे. जागतिक पातळीवरील रायडर्सच्या प्रतिसादाबद्दल सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संचालक आणि सहसंस्थापक श्री ईशान लोखंडे म्हणाले की, सीएट आयएसआरएलमध्ये ८५ जागतिक स्टार्स सहभागी होत असल्याचा अत्यंत आनंद असून जागतिक पातळीवर या लीगला उत्तम प्रतिसाद असल्याचा अभिमान आहे. भारतात सुपरक्रॉस रेसिंगचा दर्जा वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट कायम आहे आणि त्याला जागतिक पातळीवर घेऊन जायचे आहे. या लीगमधून भारतीय रायडर्सचे धैर्य दिसून येईल आणि ते जगभरात चर्चेचे ठरले. या सीएट आयएसआरएलच्या पहिल्या सत्रात ६४ रायडर्सची रायडर पूलमधून निवड केली जाईल. त्यात २० तरुण भारतीय रायडर्सही असतील. ते आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करतील. अनुभवी आणि तरूण असा मिलाप असलेल्या या रेसिंगमध्ये अभूतपूर्व असा रेसिंगचा थरार पाहायला मिळणार आहे. डिसेंबर २०२३ मध्ये होणारी सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आता जवळ येऊ घातली आहे आणि पाच संघ तयार असल्याचे घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. येत्या काळात यात आणखी टीमची भर पडणार आहे. रायडर्सच्या लिलावातून रायडर्सची निवड करण्यासाठी या टीम सज्ज झाल्या आहेत. उद्घाटनाच्या सत्रात भारतातील तीन शहरामध्ये विविध थरारक फेऱ्या पाहायला मिळणार आहेत. यात चार रेसिंग गट असतील. ४५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, केवळ २५० सीसी आंतरराष्ट्रीय रायडर्स, २५० सीसी इंडिया एशिया मिक्स आणि ८५सीसी ज्युनिअर क्लास असे हे चार गट असतील. या लीगमध्ये थरारक आणि रोमांचकारी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. रायडर नोंदणी, प्लेअर ऑक्शन आणि आयएसआरएलच्या पहिल्या सत्राचे नियोजन ही सर्व माहिती मिळवण्यासाठी कृपया एसएक्सआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://indiansupercrossleague.com/

Read More
BusinessLatest News

शेफलरची रेप्क्सपर्ट टेक्निकल ट्रेनिग व्हॅन व्यावसायिक वाहन क्षेत्राला करणार सक्षम

नवी दिल्ली| शेफलर इंडिया लिमिटेड ही औद्योगिक आणि वाहन क्षेत्रातील आघाडीची पुरवठादार कंपनी असून, कंपनीने ऑक्टोबर २०१९ मध्ये रेप्क्सपर्ट मोबाइल ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. कंपनीने आज खास व्यावसायिक वाहनांसाठी रेप्क्सपर्ट टेक्निकल ट्रेनिंग व्हॅन लाँच करत असल्याची घोषणा केली. व्यावसायिक वाहन क्षेत्रातील हा पहिलाच असा उपक्रम असून यामध्ये परिवाहन, चेसिस सिस्टिम आणि वेगाने पुढे येणाऱ्या ऑटोमोटिव्ह अॅप्लिकेशन्सचे प्रशिक्षण यामध्ये दिले जाणार आहे. रेप्क्सपर्टची ब्रँडेड ट्रेनिंग व्हॅन ही छत्तीसगढ, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतून प्रवास करण्यास तयारआहे. वाहन क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना आणखी कुशल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे शेफलरच्या या मोहिमेतून दिसून येते. यामुळे त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचेही ज्ञान मिळणार आहे. शेफलर इंडियाच्या ऑटोमोटिव्ह अफ्टरमार्केट विभागाचे अध्यक्ष देबाशिष सतपती म्हणाले की, व्यावसायिक वाहन क्षेत्र हे भारतीय ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यातून देशाच्या आर्थिक स्थिती दिसून येते. या क्षेत्रासाठी खास ट्रेनिंग व्हॅन सुरू करून आम्ही केवळ कौशल्य विकासावर भर देणार नाही तर व्यावसायिक वाहने क्षेत्रातील आव्हानांचीही माहिती देणार आहोत. आपल्या तंत्रज्ञांना सध्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हवी आणि ते उद्योगातील बदलात सदैव पुढे असायला हवे. हा उपक्रम म्हणजे शेफलरच्या वाहन उद्योगात तज्ज्ञ निर्माण करण्याच्या कटिबद्धतेचे मूर्त रूप आहे. या प्रशिक्षण व्हॅनमधील अभ्यासक्रमात पुढील घटकांचा समावेश आहे – क्लच फिटकरताना क्लच आणि फ्लायव्हीलचे मेकॅनिजम कसे हाताळावे इन्स्टॉल केल्यानंतर क्लच रिलिज चेकिंग कसे करावे क्लच रिलिजसाठी हायड्रोलिक प्रेसचा वापर कसा करावा स्पेशल टूलद्वारे वैज्ञानिक दृष्ट्या क्लच बसवण्याची प्रक्रिया डायफ्रेम आणि कॉईल टाइफ कव्हर असेंब्लीमधील फरक विशेष टूल्सने युनिव्हर्सल जॉइंट क्रॉस फिट करणे व्यावसायिक वाहनांसाठी लागणाऱ्या ल्युब्रिकंट्सची माहिती पॅसेंजर कार क्षेत्रातील मोहिमेत यश मिळाल्यानंतर त्यावर आधारीत तयार करण्यात आलेल्या या नव्या मोहिमेत शेफलर इंडियाचा ऑटोमोटिव्ही आफ्टरमार्केट विभाग टेक्निशिअन आणि मेकॅनिक्सला प्रशिक्षणाद्वारे सक्षम करत राहणार आहे. आधीच्या मोहिमांमधून मिळालेल्या अभिप्रायांनंतर यात अनेत बदल करण्यात आले आहेत. या व्हॅनमध्ये खास महत्त्वाच्या उत्पादन क्षेत्राचा माहिती असेल. शेफलर इंडिया नवी मोहीम सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे. आतापर्यंत १३० शहरांमध्ये ५००० हून अधिक मेकॅनिक्सला या मोहिमेत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातून तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि ग्राऊंड लेव्हल ट्रेनिंग देण्यात शेफलरची कटिबद्धता दिसून येते. ऑक्टोबर २०१९ मध्ये शेफलर इंडियाने पहिले मोबाइल ट्रेनिंग सेंटर सुरू करून या मोहिमेला सुरूवात केली होती. प्रत्येक कॅम्पेनच्या माध्यमातून हेच दिसून आले आहे की, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात कौशल्य विकास करणे आणि माहितीची देवाण घेवाण करण्यासा शेफरल वचनबद्ध आहे. शेफलर समूह – आम्ही चळवळ उभी करतो शेफलर समुहाने गेल्या ७५ वर्षांमध्ये अनेक नवे तथा अभूतपूर्व नवीन गोष्टी आणल्या आहेत आणि विकसित केल्या आहेत. तंत्रज्ञानातील नाविन्यता, उत्पादन आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सेवा, कार्बन उत्सर्जनविरहित वाहतूक, चेसिस सोल्युशन्स, इंडस्ट्री ४.०, डिजिटलाझेशन आणि अक्षय उर्जा यात कंपनी एक विश्वासू भागीदार आहे.  कंपनी ड्राइव्हट्रेन आणि चेसिस अॅप्लिकेशन्ससाठी विविध प्रकारचे उच्च दर्जाचे उत्पादने तयार करते. याशिवाय रोलिंग आणि प्लेन बेअरिंगचे सोल्युशन्सही अनेक उद्योगांना पुरवते. शेफलर समूहाने २०२२ मध्ये १५.८ अब्ज युरोची विक्री केली आहे. शेफलर समूहाचे ८४ हजाराहून अधिक कर्मचारी असून जगातील सर्वांत मोठी कुटुंबाच्या मालकीची कंपनी आहे. २०२२ मध्ये कंपनीकडे १२५० पेटंट असून डीपीएमए (जर्मन पेटेंट अँड ट्रेडमार्क ऑफिसच्या)नुसार शेफलर ही जर्मनीतील चौथी सर्वांत इनोव्हेटिव्ह कंपनी आहे.  

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठवाडा-विदर्भातील जिल्ह्यांना प्रकल्प मान्यतेसाठी आता संख्येची मर्यादा नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई  : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी जिल्हानिहाय कृषी

Read More
Latest NewsMAHARASHTRA

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून करचोरी करणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई

मुंबई  : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्यामध्ये कर रक्कम रु. १५.८७ कोटीच्या

Read More
Latest NewsPUNE

पुणे नवरात्रौ महोत्सवात साकारणार १० सिने अभिनेत्रींचा नृत्याविष्कार

पुणे :  २९ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचा यंदाचा उद्घाटन सोहळा  घटस्थापनेच्या दिवशी  रविवार  दि. १५  ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

PMP च्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) व बक्षिस रक्कम दिली

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ऊर्जा विभाग आणि ISEG फाऊंडेशन यांच्यात ‘ऊर्जा संक्रमण ब्लू प्रिंट’ संदर्भात सामंजस्य करार

Read More
Latest NewsPUNE

अ‍ॅड. अजित अर्जुन चौगुले यांना महाराष्ट्र रत्न २०२३ पुरस्कार

पुणे: हडपसर येथील अ‍ॅड. अजित अर्जुन चौगुले यांना  राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न २०२३ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. टाइम्स ऑफ

Read More
ENTERTAINMENTLatest News

Indian Idol : भारतातील प्रतिभेची पुढची फळी शोधून त्यांच्यावर संस्कार करण्याची संधी मिळणे ही गौरवाची बाब – श्रेया घोषाल

  ‘एक आवाज, लाखों एहसास’ हे इंडियन आयडॉल 14 चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची

Read More
ENGLISH

International Day of the Girl Child: Development Sector Renews Commitment to Empower Girls

New Delhi :  Today, the world celebrates the International Day of the Girl Child, a day dedicated to raising awareness

Read More
Latest NewsLIFESTYLEPUNE

पुणेकरांना मिळणार प्लांट ट्रकची सेवा

पुणे  : नैसर्गिक हिरवाईचे मानवाला कायमच आकर्षण राहिले आहे. घराच्या आजूबाजूला फुलवलेली बाग हे त्याचे एक उत्तम उदाहरण. वाढत्या शहरीकरणामुळे

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार – दिलीप वळसे पाटील

मुंबई  : नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी- सेवा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आठ महिन्याच्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई लढली बिबट्याशी

आंबेगाव : रात्रीच्या अंधारात बिबट्या आपल्या आठ महिन्याच्या पोटच्या गोळ्याला ओढून घेवून जात असताना जाग आलेल्या आईने चक्क बिबटयाशीच लढत

Read More
ENTERTAINMENTLatest News

प्रेमाची पाखरं भिरभिरतायेत, जोड्यांमध्ये नाती फुलतायेत

मालिकांमध्ये लागणार प्रेमाची चाहूल. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीच्या लग्नानंतर आता त्यांचा संसार सुरु झाला असून अधिपती अक्षरांचं मन जिंकण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सगळ्यांना उत्सुकता लागली आहे ती अधिपती आणि अक्षरा मध्ये प्रेमाच्या नात्याची कळी कधी खुलणार याची. ‘३६ गुणी जोडी’ ह्या मालिकेत अमुल्या आणि वेदांतला लागणार प्रेम रंगाची चाहूल एकमेकात टशन असलेले वेदांत आणि अमूल्या आता एकत्र येतील

Read More
BusinessLatest News

हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजतर्फे भारतातील पहिला  ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब सादर

नवी दिल्ली : भारतातील सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीजने भारतातील पहिला ‘अप-डाउन ग्लो’ एलईडी बल्ब बाजारात

Read More
Latest NewsLIFESTYLE

येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोरियन कला प्रदर्शनाचे आयोजन

पुणे  : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) आणि कोरियाचे के आर्ट इंटरनॅशनल एक्स्चेंज असोसिएशन यांच्या संयुक्त

Read More