Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भिमा कोरेगाव शौर्यदिन नियोजनाबाबत बैठक १ नोव्हेंबरला


पुणे : 1 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन नियोजनाच्या अनुषंगाने , या उत्सवाशी संबंधित सर्वच व्यक्ती , संस्था , संघटना , राजकीय पक्ष व साहीत्य विक्रेते स्टॉलधारक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येत आहे. सदर बैठकीला सर्व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना ,नेते कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहाण्याचे आवाहन भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे . सदर बैठकीतील चर्चेचा विस्तृत अहवाल राज्यशासन व जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील समितीस सादर करण्यात येवुन त्याचे अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

आपल्या मागणी नुसार यंदाच्या वर्षी देखिल नियोजनाचा संपुर्ण खर्च राज्यसरकार करणार आहे. व यंदाच्या वर्षी मागिल वर्षा पेक्षा अधिक आर्थिक तरतुद करणार आहेत.
आपल्या सुचना व विचारांचे आदान – प्रदान करण्यासाठी सदर बैठकीत सहभागी व्हावे. सदरील बैठक अल्पबचत भवन क्विन्स गार्डन पुणे येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे .तसेच या वेळी आपल्या सूचना विचारात घेऊन अंबालाबजावणी साठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डंबाळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading