Wednesday, October 14, 2026
BusinessLatest News

दावे (क्लेम्स) हेच विश्वासाचे आहे चलन – डॉ. पोरस पेश्तोतॉन

पुणे : विमा हे आज दिलेले एक वचन आहे. ते अनेक वर्षांनंतर उद्भवणाऱ्या गरजेसाठी दिले जाते. परंतु, या वचनाची खरी कसोटी फक्त एकाच क्षणी लागते: विमा हप्ता भरला जातो तेव्हा. त्यामुळेच, विमा हप्ता भरण्याच्या प्रक्रियेकडे केवळ एक कार्यात्मक मापदंड म्हणून न पाहता, जीवन विमा कंपनीसाठी विश्वासाचे चलन म्हणून पाहिले पाहिजे. तसेच, एखादी विमा कंपनी आपला मूलभूत उद्देश पूर्ण करत आहे की नाही, याचे हे सर्वात स्पष्ट मोजमाप आहे.

भारताची विमा बाजारपेठ विस्तारत असल्यामुळे या प्रश्नाचे महत्त्व वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये जीवन विमा उद्योगाने ८.८६ लाख कोटी रूपयांचा प्रीमियम गोळा केला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ६.७३ टक्क्यांनी अधिक होता. तरीही, जीवन विम्याचा प्रसार जीडीपीच्या २.७ टक्क्यांपर्यंत घसरला.

अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड चे मुख्य अंडररायटर डॉ. पोरस पेश्तोतॉन म्हणाले की ॲक्सिस मॅक्स लाईफमध्ये आमचा वैयक्तिक मृत्यू दाव्यांचा पेड रेशो सलग पाच वर्षे ९९% पेक्षा जास्त राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२१–२२ मधील ९९.३४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये तो सातत्याने सुधारून ९९.८ टक्के झाला आहे. त्यामुळे तो या उद्योगातील अग्रगण्य क्लेम्स पेड रेशोपैकी एक आहे. केवळ आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्येच आम्ही १,६४१ कोटी रूपयांचे २०,५२९ वैयक्तिक मृत्यू दावे निकाली काढले. तथापि, महत्त्वाचा मुद्दा ही आकडेवारी नाही. तर आकडेवारी काय दर्शवतो, हे महत्त्वाचे आहे. ती म्हणजे दिलेली वचने पाळण्याची संस्कृती.

दावे अशा प्रकारे ब्रँडची ओळख निर्माण करतात, जी जाहिरातूनही होईलच असे नाही. कठीण काळात ज्या विमा कंपनीने त्यांना आधार दिला, ती कुटुंबे लक्षात ठेवतात. ते हा अनुभव नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करतात. अशा बाजारपेठेत जिथे आर्थिक निर्णय अनेकदा वैयक्तिक शिफारशींवरून घेतले जातात, तिथे प्रत्येक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेला दावा एक शक्तिशाली आणि विश्वासार्ह ब्रँड कथा बनतो.

थोडक्यात सांगायचे तर विश्वास फक्त शब्दांनी निर्माण होऊ शकत नाही. तो कृतीतून, एका वेळी एक कुटुंब आणि एका दाव्याद्वारे कमावला जातो. त्यामुळे दावे हे केवळ आर्थिक व्यवहारांपेक्षा अधिक आहेत. हे ते क्षण असतात जेव्हा विम्याला त्याचा अर्थ प्राप्त होतो, दिलेले वचन सत्यात उतरते आणि विश्वास मूर्त स्वरूपात येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading