Tuesday, June 16, 2026

Day: October 27, 2023

ENTERTAINMENTLatest News

सनी लिओनीचा ‘केनेडी’ MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये करणार धमाकेदार पदार्पण

अभिनेत्री सनी लिओनी चा चित्रपट “‘केनेडी ” 29 ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठित मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग इमेज (MAMI) चित्रपट महोत्सवात

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘दणकेबाज’ आयटमचा तडका घेऊन तरुणाईला भुरळ पाडायला सज्ज् झाली आहे झेबा शेख

मराठी सिनेसृष्टीत सध्या आयटम साँगची चलती आहे. सध्या सर्वत्र या मराठी आयटम सॉंगचं राज्य असलेलं पाहायला मिळतंय. हिंदी गाण्यांपेक्षा आता

Read More
BusinessLatest News

बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटतर्फे बजाज फिनसर्व्ह बँकींग आणि पीएसयू फंड

पुणे  : बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बँकींग अॅण्ड पीएसयू फंड ही आपली चौथी निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना बाजारात

Read More
BusinessLatest News

म्हैसूरच्या महाराजांच्या हस्ते सायकल प्युअर अगरबत्तीच्या संस्थापकांवरील पुस्तकाचे प्रकाशन

पुणे  : म्हैसूरच्या राजघराण्याचे वंशज श्रीमंत श्री यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी सध्या सुरू असलेल्या दसरा उत्सवादरम्यान सायकल प्युअरचे संस्थापक 

Read More
BusinessLatest News

महिंद्रा लाईफस्पेसेसने भारतातील पहिला, मेटावर्सवर घर खरेदी अनुभव प्रस्तुत केला

पुणे: महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) या महिंद्रा ग्रुपमधील स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सेवासुविधा विकास कंपनीने भारतातील पहिला, मेटावर्सवरील घर खरेदी अनुभव, महिंद्रा सिटाडेलचा दुसरा टप्पा असलेल्या बॅस्टियनच्या शुभारंभ प्रसंगी प्रस्तुत केला. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा टप्पा एका ड्रोन शोमार्फत सादर करण्यात आला, हा ड्रोन शो अशाप्रकारचा पहिलाच शो आहे. याची सांगता पुण्याच्या आकाशामध्ये एक क्यूआर कोड प्रस्तुत करून करण्यात आली, हा क्यूआर कोड वापरून दर्शकांना मेटावर्स अनुभव घेता आला. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रोजेक्ट लोकेशनवर या प्रोजेक्टचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ५०० पेक्षा जास्त ड्रोन्सनी अतिशय नयनरम्य शो प्रस्तुत केला, यामध्ये प्रोजेक्टची इकोटोन डिझाईन, होम ऑटोमेशन फीचर्स यासारखी प्रमुख वैशिष्ट्ये दर्शवणारी व्हिज्युअल्स दाखवण्यात आली आणि त्यानंतर मेटावर्स अनुभव सादर करण्यात आला. सरतेशेवटी या ड्रोन्सनी एक क्यूआर तयार केला, तो स्कॅन करून महिंद्रा सिटाडेलचा मेटावर्स अनुभव दर्शकांना मिळवता आला. अतिशय अनोख्या आणि अशाप्रकारच्या पहिल्याच मेटावर्स अनुभवाने युजर्सना त्यांच्या भविष्यातील घरांची सैर घडवली. घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्याच्या आधीच भविष्यातील घर पाहण्याचा आनंद युजर्सना अनुभवता आला. यामध्ये युजर्स घरातील घटकांसोबत संवाद साधून आपल्या आवडीप्रमाणे इंटेरियर डिझाईन करू शकतात. महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. अमित कुमार सिन्हा यांनी सांगितले, “महिंद्रा लाईफस्पेसेसने आपले लक्ष जिथे केंद्रित केले आहे अशा पुण्यातील महिंद्रा सिटाडेलमधील बॅस्टियन लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुण्यातील जोमदार स्थावर मालमत्ता वातावरण आणि नावीन्य स्वीकारण्याचा उत्साह या दोन्ही गोष्टी आमच्या व्हिजनला अतिशय साजेशा आहेत. पुणे शहरात याआधीच्या आमच्या प्रोजेक्ट्सना भरघोस यश मिळाले आहे, आमच्या ब्रँडवर पुणेकर ग्राहकांनी ठेवलेला विश्वास यामधून दिसून येतो. हा इमर्सिव्ह आणि इंटरॅक्टिव्ह मेटाव्हर्स या उद्योगक्षेत्रात एक नवे मानक स्थापित करत आहे, इतकेच नव्हे तर, आमच्या ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील घरांची खरी कल्पना करण्याची अनोखी संधी देखील प्रदान करत आहे. अशाप्रकारचा अनोखा अनुभव अतिशय शानदार पद्धतीने प्रस्तुत करणे आवश्यक होते, त्यासाठी आम्ही ड्रोन शोचा वापर केला.  रियल इस्टेटमध्ये ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यामध्ये हे महत्त्वाकांक्षी पाऊल आम्ही उचलले आहे. भविष्यात देखील आम्ही नावीन्याच्या सीमा ओलांडून आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करणे सातत्याने सुरु ठेवू.” नोव्हेंबर २०२२ मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या फेजला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर, प्रस्तुत करण्यात आलेले, महिंद्रा सिटाडेलमधील बॅस्टियन ९.६६ एकरावर वसवण्यात येत असून, यामध्ये अतिशय विचारपूर्वक डिझाईन करण्यात आलेली, प्रीमियम ३ व ४ बीएचके घरे असतील. याठिकाणी अनेक, विविध सुविधा पुरवल्या जातील, रहिवाशांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण विचारात घेऊन त्यांची रचना करण्यात आली आहे.  यामध्ये संतुलित व उत्साहपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा असा हा प्रोजेक्ट असणार आहे. महिंद्रा सिटाडेलमधील घरे प्री-सर्टिफाईड आयजीबीसी गोल्ड रेटेड असतील आणि ऊर्जा बचत व कचरा व्यवस्थापन यासाठी यामध्ये डिझाईन व प्रक्रियांमध्ये अनेक उपाययोजना करण्यात येतील. राज्यातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गापासून अगदी जवळ असलेला हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडमधील एक अतिशय प्रतिष्ठित निवासी ठिकाण म्हणून गणला जात आहे. हिंजवडीचे आयटी हब, पिंपरीचे संत तुकाराम नगर आणि पीसीएमसी मेट्रो स्टेशन्स इथून सोयीस्करपणे पोचता येण्याजोग्या अंतरावर आहेत. या भागात अनेक मोठमोठे मॉल्स, प्रतिष्ठित शाळा, महाविद्यालये, मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि मनोरंजन, खानपानाचे अनेक पर्याय आहेत, सहाजिकच इथे सेवासुविधांची मुबलकता व जीवनशैली यांचा पुरेपूर अनुभव घेता येतो. जुना मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-धुळे, नाशिक महामार्ग, कासारवाडी आणि पिंपरी यासारखी रेल्वे स्टेशन्स, पिंपरी चौक बस स्टॉप आणि संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन ही सर्व ठिकाणे इथून जवळ असल्याने वाहतुकीचे अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत.

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा हमाम मधील टॉवेल फाईट सीन खूपच ऐतिहासिक होता!’ : अभिनेत्री मिशेल ली

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ली, जो अत्यंत कठिन फाईट सिक्वेन्स शूट करण्यात माहिर आहे,तिने ब्लॅक विडोमध्ये स्कार्लेट जोहानसन, पायरेट्स ऑफ द

Read More
ENTERTAINMENTLatest News

दिवाळीच्या धामधुमीत अक्षर कोठारीची नवी मालिका येणार भेटीला

बंध रेशमाचे, छोटी मालकीण, स्वाभिमान या स्टार प्रवाहच्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Read More
BusinessLatest News

वॉर्डविझार्डची इलेक्ट्रिक वाहन अँक्सिलियरी क्लस्टरच्या विकासात आघाडी

वडोदरा – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. या जॉय ई बाइक ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने गुजरात

Read More
ENTERTAINMENTLatest News

‘या’ मालिकेत महेश ठाकूर साकारणार प्रेमळ पित्याची भूमिका

सोनी सबवरील ‘आंगन – अपनों का’ या आगामी मालिकेत एका अशा मुलीची गोष्ट आहे, जी आपल्या वडिलांची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळण्यास

Read More
ENTERTAINMENTLatest News

दरोगा हप्‍पू सिंगला नवरात्री उत्‍सवादरम्‍यान प्रेक्षकांकडून मिळाले भरपूर प्रेम!

नवरात्री हा भारतातील सर्वात खास सणांपैकी एक आहे, जो अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मध्य प्रदेशात, हा सण

Read More