Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

वॉर्डविझार्डची इलेक्ट्रिक वाहन अँक्सिलियरी क्लस्टरच्या विकासात आघाडी

वडोदरा – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. या जॉय ई बाइक ब्रँडअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने गुजरात सरकारसह २०२४ पर्यंत इलेक्ट्रिक व्हिइकल अँक्सिलियरी क्लस्टरच्या विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासाठी २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या विकासाला चालना मिळेल आणि ते राज्याअंतर्गत वाहतुकीच्या हरित पर्यायांचा विकास करण्याच्या राज्याच्या धोरणाशी सुसंगत ठरेल.
गुजरात सरकारसह सामंजस्य करारावर सही करण्याचा हा लक्षणीय कार्यक्रम गांधीनगर येथील व्हायब्रंट ग्लोबल समिट २०२४ चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या करारावर एस. जे. हैदर, अतिरिक्त प्रमुख सचिव – उदेयोग आणि खाणकाम विभाग आणि श्री. यतिन संजय
गुप्ते, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी विभाग यांनी सह्या केल्या. वरिष्ठ सरकारी मान्यवर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शान आणखी वाढली, शिवाय इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रासाठी या सहकार्याचे असलेले महत्त्व अधोरेखित
झाले.

या कराराअंतर्गत वॉर्डविझार्ड २००० कोटी रुपयांची लक्षणीय गुंतवणूक करण्यासाठी सज्ज असून ही गुंतवणूक महत्त्वाच्या विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. त्यात इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे संशोधन आणि विकास, वडोदरा कारखान्यातील मोटर जुळणी सुविधा, लि- आयन सेल
उत्पादन, कच्च्या मालाच्या उत्पादनांसाठी अँक्सिलरीजचा विकास यांचा समावेश असेल. त्याशिवाय या सुविधेमुळे राज्यात ५००० पेक्षा जास्त रोजगार संधी तयार होऊन त्याचा इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्र तसेच प्रादेशिक स्तरावरील नोकऱ्यांच्या बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम होईल.

सामंजस्य कराराविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  यतिन संजय गुप्ते म्हणाले, ‘आम्ही गुजरात सरकारचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. सरकारच्या धोरणाशी सुसंगत असलेले आमचे धोरण या क्रांतीकारी भागिदारीला
चालना देईल. या सामंजस्य कराराच्या निमित्ताने इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्र आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाप्रती असलेली आमची बांधिलकी मजबूत झाली आहे. २००० कोटी रुपयांच्या लक्षणीय गुंतवणुकीच्या मदतीने आम्ही स्थानिक यंत्रणा मजबूत करत ५००० रोजगार संधी तयार करण्याचे
आणि हरित, स्वावलंबी भारत तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे. ही गुंतवणूक मेक-इन-इंडियासाठी महत्त्वाची असून त्यामुळे पुरवठा साखळीवरील ताण आणि आयातीवरचे अवलंबित्व कमी होईल.
लिथियम- आयन सेल्स, मोटर कंट्रोलर, चार्जर इन- हाउस यांचे उत्पादन तसेच दुसरीकडे तंत्रज्ञान व संशोधनामध्ये गुंतवणूक, संशोधनाचा विस्तार आणि विकासाचे प्रयत्न, बाजारपेठ उपक्रमांचा विकास यांच्या माध्यमातून ते शक्य होईल.’
वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. आणि गुजरात सरकार यांच्यातील सामंजस्य करारामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगात नाविन्य व शाश्वततेचा नवा काळ सुरू होईल. मेक-इन-इंडियावर असलेला भर आणि हरित वाहतुकीसाठी केले जात असलेले प्रयत्न यांच्यासह ही भागिदारी उज्ज्वल, स्वयंपूर्ण
भविष्याच्या दिशेने प्रवास करेल. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचा विकास होत असताना ही भागिदारी जास्त हरित आणि स्वयंपूर्ण भारताला आकार देण्यासाठी महत्त्वाची घटना असून त्यामुळे हा उद्योग तसेच देशाचा मोठा लाभ होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading