Sunday, August 30, 2026
ENTERTAINMENTLatest News

दिवाळीच्या धामधुमीत अक्षर कोठारीची नवी मालिका येणार भेटीला

बंध रेशमाचे, छोटी मालकीण, स्वाभिमान या स्टार प्रवाहच्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या नव्या मालिकेत अक्षर अद्वैत चांदेकर ही व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. अद्वैत बिझनेस मॅन आहे. वडिलोपार्जित चालत आलेला सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस तो एकटा सांभाळतो. बिझनेसशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. तो जे पारखून घेईल त्यात चूक शोधूनही सापडणार नाही.

हे नवं पात्र साकारण्यासाठी अक्षर फारच उत्सुक आहे. अद्वैत चांदेकर या व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत माझं जुनं नातं आहे. प्रवाह कुटुंबाचा भाग असल्याचा आनंद आहे. दिवाळीच्या धामधुमीत माझी लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवी मालिका भेटीला येतेय. स्वाभिमान संपल्यानंतर नवीन काय अशी सातत्याने विचारणा होत होती. लक्ष्मीच्या पाऊलांनीच्या निमित्ताने नवं पात्र साकारायला मिळत आहे. इशा केसकरसोबत पहिल्यांदाच काम करतोय. भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली. याआधीच्या मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे अशी भावना अक्षर कोठारीने व्यक्त केली.

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका लक्ष्मीच्या पाऊलांनी २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading