विनातिकीट प्रवाशांकडून ‘पीएमपीएमएल’ने वसूल केला ३ लाख ९२ हजार ५०० रु. दंड
पुणे : ‘पीएमपीएमएल’ (PMPML) कडून प्रवाश्यांच्या सुविधेसाठी ई – तिकीट मशीन द्वारे कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) पेमेंट सुविधेला १ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र तरी देखील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास (ticketless passengers ) करत असल्याचे आढळून आले आहे. ‘पीएमपीएमएल’ने दि. १ ऑक्टोबर ते दि. १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाश्यांकडून तब्बल ३ लाख ९२ हजार ५०० रूपये दंडवसूल करण्यात आला आहे.
‘पीएमपीएमएल’ बस मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना ‘पीएमपीएमएल’ कडून प्रती प्रवासी रक्कम रुपये ५०० चा दंड आकारण्यात येतो. त्यानुसार ६१९ प्रवाशांकडून ३ लाख ९२ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एकूण दंडवसुली रक्कम रूपये खालील प्रमाणे –
०१/१०/२०२३ – ११,००० रुपये
०२/१०/२०२३ – २५,००० रुपये
०३/१०/२०२३ – २०,००० रुपये
०४/१०/२०२३ – २८,००० रुपये
०५/१०/२०२३ – २८,००० रुपये
०६/१०/२०२३ – १९,५०० रुपये
०७/१०/२०२३ – २७,५०० रुपये
०८/१०/२०२३ – १९,५०० रुपये
०९/१०/२०२३ – ३७,००० रुपये
१०/१०/२०२३ – ३२,००० रुपये
११/१०/२०२३ – २४,५०० रुपये
१२/१०/२०२३ – २९,५०० रुपये
१३/१०/२०२३ – ३३,५०० रुपये
१४/१०/२०२३ – २८,५०० रुपये
१५/१०/२०२३ – २९,००० रुपये
एकूण ३,९२,५००/-
