Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

PMPMLने कॅशलेस पेमेंट सुविधेच्या माध्यमातून 15 दिवसांत कमावले लाखोंचे उत्पन्न

  • पंधरा दिवसात कॅशलेस पेमेंट सुविधेच्या माध्यमातून साडेबारा लाखाचे उत्पन्न.
  • ई – तिकीट मशीन मध्ये कॅशलेस पेमेंट द्वारे ४७ हजार तिकिटांची विक्री.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) १ ऑक्टोबर २०२३ पासुन प्रवाश्यांच्या सुविधेसाठी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) पेमेंट सुविधेला सुरूवात करण्यात आली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या पंधरा दिवसात महामंडळाला तब्बल १२ लाख ५५ हजार २६ रुपये इतके उत्पन्न मिळाले असून ४६,९२२ तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. तर ५७, ७९५ प्रवाशांनी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) तिकीट काढली आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट काढण्यासाठी कॅशलेस (क्युआर
कोड द्वारे) पेमेंट सुविधेद्वारे तिकीट काढणेसाठी वापर सध्या वाढत असल्याचे या आकडेवारी वरून दिसून येत आहे.
तरी जास्तीत-जास्त प्रवासी नागरिकांनी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) पेमेंट सुविधेचा वापर करण्याचे आवाहन पुणे
महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

कॅशलेस पेमेंट सुविधेच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न खालील प्रमाणे – 

दिनांक यु.पी.आय कॅश र.रु. यु.पी.आय तिकीट विक्री  प्रवासी संख्‍या
०१/१०/२०२३ ४५,२८१/- १,६७० २,२००
०२/१०/२०२३ ५६,५४१/- २,२४७ २,७८३
०३/१०/२०२३ ४८,२००/- १,९७८ २,३६४
०४/१०/२०२३ ५४,७३०/- २,१७२ २,५५४
०५/१०/२०२३ ५९,७०१/- २,४१८ २,७८९
०६/१०/२०२३ ६९,१८३/- २,६९९ ३,२२९
०७/१०/२०२३ ७५,६९९/- २,७७४ ३,३९७
०८/१०/२०२३ १,१४,४२१/- ३,९५५ ५,३१३
०९/१०/२०२३ ८७,००९/- ३,४७७ ४,०२४
१०/१०/२०२३ ७५,४७०/- २,८३४ ३,२९०
११/१०/२०२३ ८६,७९१/- ३,३०१ ३,८४१
१२/१०/२०२३ १,०४,११६/- ३,८१८ ४,५४४
१३/१०/२०२३ १,१५,४३७/- ४,३०० ५,१८०
१४/१०/२०२३ १,०५,५०४/- ३,९०१ ४,९११
१५/१०/२०२३ १,५६,९४३/- ५,३७८ ७,३७६
एकूण १२,५५,०२६/- ४६,९२२ ५७,७९५

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading