डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर
अभियांत्रिकी, खरेदी आणि उत्पादनाद्वारे तेल आणि वायू, उर्जा (अणु ऊर्जेसह), रसायने आणि इतर प्रक्रिया उद्योगांसाठी विशेष प्रक्रिया पाइपिंग सुविधा पुरविणारी अभियांत्रिकी कंपनी डी डेव्हलपमेंट इंजिनीअर्स लिमिटेडने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.
कंपनी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे इक्विटी समभागांच्या ऑफरद्वारे (प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य) निधी उभारण्याची योजना आखत आहे. या योजनेमध्ये 325 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि विक्री समभागधारकांद्वारे 7,900,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी निधी; कंपनी आणि तिच्या उपकंपन्या, डीईई पाइपिंग सिस्टीम्स (थायलंड) कंपनी लिमिटेड आणि डीईई फॅब्रिकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेल्या सर्व किंवा काही थकबाकी कर्जाच्या काही भागाची पूर्वफेड किंवा परतफेड; आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी कंपनीने फ्रेश इश्यूतून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
अनेक औद्योगिक विभागांमधून उद्भवणारी जटिल प्रक्रिया पाइपिंग आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तांत्रिक क्षमतेच्या दृष्टीने डी डेव्हलपमेंट इंजिनियर्स लिमिटेडला सध्या जगातील आघाडीच्या प्रोसेस पाईप सोल्युशन पुरवठादारांपैकी एक म्हणून गणण्यात येत आहे. (स्रोत: डी अँड बी अहवाल) सध्या, स्थापित क्षमतेच्या बाबतीत कंपनी भारतातील प्रक्रिया पाइपिंग सोल्यूशन्समधील सर्वात मोठी कंपनी आहे. (स्रोत: डी अँड बी अहवाल).
विक्रीच्या ऑफरमध्ये कृष्ण ललित बन्सल (विक्री समभागधारक) यांच्या 7,900,000 इक्विटी समभागांचा समावेश आहे. (“विक्रीची ऑफर”).
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
