Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्स आणि साऊथ इंडियन बँक यांचा करार

कोची- भारतातील आघाडीची खासगी लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्सने आघाडीची खासगी बँक साऊथ इंडियन बँकेशी करार केल्याची घोषणा आज केली. दोन्ही कंपन्यांनी कोचीमध्ये करारवर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराच्या माध्यमातून साऊथ इंडियन बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालिन वित्तीय उद्दिष्टांची पूर्तता करता येणार आहे. त्यांना बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्सच्या विविध मौल्यवान उत्पादनांमध्ये ९४२ बँक शाखांच्या माध्यममातून गुंतवणूक करता येणार आहे.

साऊथ इंडियान बँकेचे सीजीएम आणि रिटेल बँकिंग डिपार्टमेंटचे कंट्री हेड श्री संचय कुमार यांनी बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्ससोबतच्या करारावर स्वाक्षरी केली.

या भागीदारीबद्दल बोलताना बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्सच्या संस्थात्मक व्यवसाय विभागाचे मुख्य वितरण अधिकारी श्री धीरज सेहगल म्हणाले की, ग्राहकांना सक्षम वित्तीय पोर्टफोलिओद्वारे अधिक सक्षम बनवणे हे बजाज अलियांझ लाईफ आणि साऊथ इंडियन बँकेचे एकत्रित उद्दिष्ट आहे. एकाच छताखाली गुंतवणूक आणि जोखिममुक्त उत्पादने ग्राहकांना देण्यासाठी या भागीदारीचा फायदा होणार आहे. यासाठी साऊथ इंडियन बँकेच्या प्रमुखांना आणि त्यांच्या टीमला जी मदत लागेल ती पुरवायला आम्ही तयार आहोत. त्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या वित्तीय उद्दिष्टांची पूर्तता करता यावी यासाठी बजाज अलियांझ लाईफचे उत्पादने मिळणार आहेत.

साऊथ इंडियान बँकेचे सीजीएम आणि रिटेल बँकिंग डिपार्टमेंटचे कंट्री हेड श्री संचय कुमार म्हणाले की, बजाज अलियांझ लाईफ इन्श्युरन्स हा इन्श्युरन्स उद्योग क्षेत्रात विश्वासार्ह ब्रँड आहे आणि त्यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होतोय. त्यांची विविध प्रकारची उत्पादने आमच्या शाखांमध्ये उपलब्ध असणार आहेत. या भागीदारीच्या माध्यमातून वित्तीय समावेशकतेच्या आमच्या उद्दिष्टाला आणखी बळ मिळाले आहे. या भागीदारीमुळे सर्वांना विविध प्रकारचे विमा कवच एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आम्हाला खात्री आही की या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना त्यांचे वित्तीय भवितव्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यासाठी गुंतवणूकही करता येणार आहे.

विविध प्रकारचे उत्पादने उपलब्ध करून देण्यासह बजाज अलियांझ लाइफ इन्श्युरन्स साऊथ इंडियन बँकेच्या ग्राहकांना विविध सेवाही पुरवणार आहे. त्यामुळे त्यांना सेवेचा उत्तम अनुभवही मिळेल. व्हॉट्सअप, लाईफअसिस्ट हे इन्श्युरन्ससाठीचे विशेष अॅप, १० भाषांमध्ये असलेली वेबसाईट, कॉल सेंटर आणि इतर अनेक सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना बजाज अलियांझ लाईफची सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत नाहीत. यापुढे जाऊन इन्श्युरन्स कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश बँकेत केला जाणार असून दोन्हीकडील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा मिळणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading