एनएसई आणि बीएसईसह पुण्यात कॉमन इन्व्हेस्टर्स सर्व्हिस सेंटरचे सेबीकडून उद्घाटन
पुणे : भारताच्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदार सेवा आणि संरक्षण वाढविण्यासाठी सेबी, एनएसई आणि बीएसई विविध उपक्रम आणि उपायांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागातील गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटच्या सर्वसमावेशक सेवा प्रदान करण्यासाठी, सेबीसोबत स्टॉक एक्स्चेंज – NSE आणि BSE यांनी पुण्यात कॉमन इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर” (ISC) ची स्थापना केली आहे.
हे कॉमन सर्व्हिस सेंटर एनएसईद्वारे व्यवस्थापित केले जाईल. या सेंटरचे उद्घाटन २७ सप्टेंबर २०२३ रोजी जी.पी. गर्ग, सेबीचे कार्यकारी संचालक साहिल मलिक, सेबीचे मुख्य महाव्यवस्थापक दीप्ती अग्रवाल, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य नियामक अधिकारी पीयूष चौरासिया, वरिष्ठ उपाध्यक्ष कृष्णन अय्यर, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय प्रमुख नीतू जुनेजा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे सहयोगी उपाध्यक्ष दिनाझ श्रॉफ, बीएसई लिमिटेडचे तुषार प्रभू आणि इतर एक्सचेंज आणि डिपॉझिटरीजमधील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कॉमन इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर हे गुंतवणूकदारांसाठी व्यासपीठ म्हणून कार्यतर आहे. सूचीबद्ध कॉर्पोरेट संस्था आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये कार्यरत बाजारातील सहभागींविरुद्ध गुंतवणूकदार तक्रारी नोंदवू शकतात. बाजारातील व्यवहाराबाबत चिंता किंवा तक्रारी असतील अशा गुंतवणूकदारांसाठी हि सुविधा आवश्यक आहे.
सेबी, एनएसई आणि बीएसईच्या गुंतवणूकदार सेवांसाठी एकल खिडकी संपर्क म्हणून खालील पत्त्यावर संपर्क साधता येईल.
गुंतवणूकदार सेवा केंद्र रेगस बिझनेस सेंटर, कार्यालय क्र. 418 आणि 419, स्तर IV, प्रभावी टेक पार्क, बाणेर रोड, बाणेर, पुणे- 411045
संपर्क: अमित पाठक (020-67235938)
