Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रुग्ण सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

पुणे : पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत रुग्ण सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे रुग्णांच्या सुरक्षेबाबत संस्थेची असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली. या उपक्रमाचे उद्दिष्ट आरोग्यसेवा क्षेत्रात रुग्णांच्या सुरक्षेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे, हानी टाळण्यासाठी रुग्ण आणि आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये विश्वास वाढवणे आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे आहे.

या रुग्ण सुरक्षा सप्ताहामध्ये, आरोग्यसेवा क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी रुग्णांच्या सुरक्षिततेबाबतच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. यामध्ये उत्तम, प्रभावी संभाषणापासून काळजीपूर्वक घेण्याच्या औषधांची सुरक्षितता आणि सुरक्षित शस्त्रक्रियेतील गुंतागुंत अशा अनेक विषयांचा समावेश होता. या सत्रांमुळे रुग्णांच्या सेवेबाबतचे उत्तम ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि नवकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. सर्वोत्कृष्ट आरोग्यसेवेसाठीची रुग्णालयाची वचनबद्धताही याद्वारे अधोरेखित झाली.

या सप्ताहाचा समारोप लोकप्रिय दीक्षित डाएटचे  जनक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत झाला. आरोग्यसेवा आणि निरामय आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. दीक्षित यांनी उत्तम आरोग्यासाठी संतुलित जीवनशैलीचे महत्त्व विशद केले. त्याच्या सहभागामुळे रुग्ण सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाला नवा आयाम लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.

या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, रुग्ण सुरक्षा ही आमच्या आरोग्यविषयक तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. रुग्ण सुरक्षेचे महत्त्व अधोरखित करण्याची संधी या जागरुकता सप्ताहामुळे मिळाली आहे. या सप्ताहात विविध माहितीपूर्ण सत्रांमध्ये अनेक नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मात्र, आमचा यामागचा उद्देश केवळ जागरुकता वाढवणेच नाही, तर आरोग्य सेवा समुदायाला रूग्णांची सुरक्षितता आणि त्यांची उत्तम काळजी घेण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांसह सक्षम करणेदेखील हादेखील आहे.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले,  रुग्णाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आरोग्यसेवेच्या या गंभीर पैलूला प्राधान्य देणार्‍या या उपक्रमाचा भाग होताना मला आनंद होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading