fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

पुणे:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पवार कुटुंबीयावर आ.गोपीचंद पडळकर या माथेफिरूने अत्यंत हिन भाषा वापरून त्यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व चौक येथे पडळकर च्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले ,”चोरीचा छंद गोपिचंद “ , “पिसाळलेल कुत्र गोपिचंद “ , “गोप्याच्या बैलाला धो “ अशाप्रकारच्या धोषणा देण्यात आल्या .
सदर प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले पडळकरने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे त्याला पुणे शहरांमध्ये आल्यावर त्याचे कपडे उतरून त्याला चोप देवू व त्याला त्याच प्रकारे उत्तरे देण्यात येईल प्रसिध्दीच्या हव्यासापोटी त्याने हे वक्तव्यकरून वातावरण गढूळ करू नये
याप्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले की महाराष्ट्रच्या विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत यात कोणतीच कटुता येवू नये यांचे सर्वांनीच भान ठेवायला हवे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देशमुख यांनी विनंती केली की गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला श्वान आहे व याला आवरणे गरजेचे आहे पुणे शहरांमध्ये येरवडा येथे मनोरुग्ण रुग्णालय आहे आपण जर या ठिकाणी त्याला पाठवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण खर्च करून याचा आजार बरा करण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू
याप्रंगी शहराघ्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख , रूपाली ठोंबरे ,प्रिया गदादे, , सदानंद शेट्टी , आप्पा रेणुसे , समीर चांदेरे ,दत्ता सागरे , , शुभम माताळे , पूजा झोळ , हरेश लडकत, गुरूमित गिल , शांतीलाल मिसाळ , अभिषेक बोके , अजय दराडे व इतर पदाधिकारी मोठेया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: