सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा
पुणे: सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे येथे १४ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस विविध गुणदप्रर्शनाच्या कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार व प्राचार्य भावना नरसिंगोजु यांनी हिंदी दिवसाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
सदरील कार्यक्रमाचे आयोज़न महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे करण्यात आले होते. हिंदीच्या अध्यापिका प्रियांका आचार्य यांनी माननीय प्राचार्या व सह अध्यापकांचे स्वागत करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेमधून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच इतर विषयांच्या शिक्षकांनी हिंदी कवितांचे वाचन केले.
प्राचार्या भावना नरसिंगोजु यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.