fbpx
Monday, October 2, 2023
BusinessLatest NewsMAHARASHTRA

गणेशोत्सव २०२३ : वी ऍपवर ग्राहकांना मिळणार अष्टविनायक, लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपतीच्या लाईव्ह द र्शनाचा लाभ

पुणे : वार्षिक गणेशोत्सव सुरु होत आहे आणि आपल्या लाडक्या दैवताचे, श्री गणेशाचे स्वागत करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रात घराघरांत आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी रंगीबेरंगी सजावट, सणासुदीचे कपडे, मोदक आणि फराळाचा दरवळ, आरत्यांचे सूर असा दिमाख असणार आहे. राज्यभरातील शहरे व गावांमधील गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी सर्वच जण उत्सुक असणार आहेत.

याच काळात भारताच्या अनेक भागांमधून अनेक भाविक अष्टविनायकांचे तसेच मुंबईतील लालबागचा राजा व पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. देशभरातील वी युजर्सना श्री गणेशाचे दर्शन अगदी सहजपणे घेता यावे आणि गणेशोत्सव मनोभावे साजरा करता यावा यासाठी देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी वी ने वी ऍप आणि वी मुव्हीज अँड टीव्ही ऍपवर लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती तसेच चार अष्टविनायकांच्या लाईव्ह दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचे ठरवले आहे.

वी युजर्स आपापल्या घरूनच लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई गणपती याठिकाणी चालणाऱ्या रोजच्या पूजा, आरत्या यामध्ये सहभागी होऊ शकतील. मोबाईल फोनवर वी मुव्हीज अँड टीव्ही ऍप किंवा वी ऍपवर दररोजच्या आरत्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. ही सुविधा शेमारूच्या सहयोगाने उपलब्ध करवून देण्यात येत आहे.

गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीला लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने, लाखो भाविकांसोबत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची अनोखी संधी देखील वी युजर्सना मिळणार आहे.  मुंबईतील काही निवडक वी स्टोर्समध्ये विशेष डिझाईन करण्यात आलेले एलईडी स्क्रीन्स बसवण्यात आले आहेत.  या स्क्रीन्सवर संपूर्ण दिवसभर लालबागचा राजाचे लाईव्ह दर्शन घेता येईल.  वी स्टोर्सना भेट देणाऱ्या प्रत्येकाला तसेच इतरही भाविकांना हा आध्यात्मिक, आनंददायी अनुभव घेता येईल.

मोरगांव, सिद्धटेक, रांजणगांव आणि थेऊर येथील अष्टविनायकांचे लाईव्ह दर्शन दहा दिवसांचा गणेशोत्सव संपल्यानंतर देखील वी युजर्ससाठी उपलब्ध होत राहील.

Leave a Reply

%d bloggers like this: