fbpx
Monday, October 2, 2023
BusinessLatest News

क्रोमामध्ये आयफोन 15 खरेदी करण्याचा पहिला मान मिळवा

क्रोमा स्टोअर्समध्ये आयफोन 15  खरेदी करण्यासाठी केवळ दोन हजार रुपयात प्री बुकिंग  करता येणार असून 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय आणि इतर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहेत.  पूर्ण पेमेंट करणाऱ्याला डिस्काउंट मिळणार आहे.  अॅप्पलच्या लेटेस्ट आयफोन 15 सिरीजचे भारतात आगमन झाले असून मोबाईल फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. 15 सप्टेंबर 2023 पासून क्रोमा स्टोअर्समध्ये आणि croma.com या वेबसाइटवर आयफोन 15 साठी प्री बुकिंग करता येणार आहे.  आयफोन 15 सिरीज, अॅप्पल वॉच सिरीज 9 आणि अॅप्पल वॉच अल्ट्रा 2  ही गॅजेट्स 22 सप्टेंबर 2023 पासून क्रोमामध्ये उपलब्ध असतील.

क्रोमा स्टोअर आणि croma.com वर पहिल्या चार दिवसांमध्ये आयफोन 15 ची बुकिंग करणाऱ्यांना  कॉर्डेलिया क्रुझवर होणाऱ्या क्रोमा क्रूज कंट्रोल 4.0 या सोहळ्यासाठी तिकीट जिंकण्याची संधी मिळणार आहे.  मुंबई, पुणे, सुरत येथील ग्राहकांना ही संधी असेल. त्यासाठी त्यांना 15 ते 18 सप्टेंबर 2023 या काळात प्री बुकिंग करावी लागेल. 21 सप्टेंबर 2022 पर्यंत सर्व स्टोअर्स आणि वेबसाईटवर प्री-बुकिंग सुरू राहील.

याशिवाय प्रीबुकिंग करणाऱ्यांना क्रोमाद्वारे  ठराविक शहरांमध्ये एक्सप्रेस डिलिव्हरीचाही लाभ मिळेल.  ही सेवा इतर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडे मिळत नाही.  ग्राहक एक्सप्रेस डिलिव्हरी पर्यायाची निवड करून आयफोन १५ सिरीज ॲपल वॉच सिरीज9 आणि ॲपल वॉच अल्ट्रा 2 यांची प्री बुकिंग करू शकतात.  त्यामुळे त्यांच्या हातात थेट त्यांचे गॅजेट मिळू शकेल.  ही सेवा ठराविक शहरांमध्ये असेल.  ग्राहकांना 22 सप्टेंबर रोजी त्यांच्या हातात प्री बुकिंग केलेले उत्पादन मिळेल.

आयफोन 15 सिरीज  एक अनोख्या डिझाईनमध्ये आणि कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.  आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस यासाठी ब्लॅक, ग्रीन, पिंक, येल्लो आणि ब्लू या रंगाचे पर्याय तुम्ही निवडू शकता. आयफोन 15 प्रो आणि प्रोमॅक्स यासाठी टायटॅनियम फिनिशमधील नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम रंग उपलब्ध आहेत.  क्रोमाकडे हे सर्व पर्याय फ्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील. 

आयफोन 15 सिरीजची 79 हजार 900 रुपयांपासून सुरुवात होत असून या फोनच्या खरेदीसाठी विविध वित्तीय पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांना 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळू शकते,  विविध क्रेडिट आणि डेबिट कार्डवर बँक ऑफर्स मिळू शकतात,  सहा हजार* रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बेनिफिट मिळू शकते,  पाच हजार* रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर मिळू शकते.

आयफोन 15 सिरीजचे प्री बुकिंग करताना ग्राहकांना अॅप्पल ॲक्सेसरीज, एप्पल केअर प्लस, आणि प्रोटेक्ट+  प्लॅनवर दहा टक्के फ्लॅट डिस्काउंटची सुविधा मिळेल. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना साजेशी असे उत्पादन देणारी आणि तशा प्रकारे सल्ला देणारी तज्ञ टीम क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ती त्यांना खरेदीमध्ये सहाय्य करेल. त्यामुळे एकाच ठिकाणी अॅपलचे अनेक उत्पादने कोणत्याही शंकाकुशंकांविना खरेदी करता येतील. न्यूफोरिया आयफोन 15 सिरीज खरेदी करण्याच्या या उत्सवात क्रोमासोबत सहभागी व्हा.  अनोख्या डील्स आणि ऑफर्ससह क्रोमा स्टोअर आणि croma.com वेबसाइटवरून अॅपलची उत्पादने खरेदी करण्याचा आनंद घ्या.

 

Leave a Reply

%d bloggers like this: