Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

जॉन्सन्स® बेबीने आईचे वचन पूर्ण करण्याप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली

मुंबई :  लहान बाळांच्या त्वचेची देखभाल करणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रातील प्रवर्तक, जॉन्सन्स® बेबीने आपले ‘प्रॉमिस, पहले पल से’ (अर्थात ‘वचन, पहिल्या क्षणापासून’) अधोरेखित करण्यासाठी आपल्या बेबी स्किनकेयर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये १००% इंग्रिडियंट पारदर्शकता दर्शवली आहे. या नव्या लॉन्चमुळे उत्पादनांच्या आत काय आहे, त्यांचे उपयोग आणि उपयुक्तता तसेच बाळांसाठी सुरक्षित इंग्रिडियंट व त्यांची समर्पकता समजून घेणे मातांसाठी सोपे होईल, नव्या पालकांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील व आपल्या बाळांसाठी योग्य उत्पादने निवडता येतील.

उत्पादनांमधील १००% बेबी सेफ इंग्रिडियन्टसची माहिती मातांना करून घेता यावी यासाठी जॉन्सन्स बेबीने संपूर्ण जगभरात पहिल्यांदाच ऑगमेंटेड रियालिटी इनोव्हेशन सादर केले आहे. कोणत्याही शहरातील प्रमुख रिटेल आउटलेटमध्ये जाऊन AR वापरून रीयल टाइम इंटरॅक्टिव्ह अनुभव घेता येईल आणि जॉन्सन्स® बेबी उत्पादनांच्या आत काय आहे, कोणती इंग्रिडियंट वापरली गेली आहेत व त्यांची नेमकी भूमिका काय ते पाहता व समजून घेता येईल. या लॉन्चमुळे भारत ही संपूर्ण जगभरातील पहिली बाजारपेठ ठरली आहे जिथे जॉन्सन्स® बेबीच्या सर्व प्रमुख उत्पादनांच्या बाबतीत AR इनोव्हेशनचा अनुभव घेता येईल.  त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार केला जाईल.

गेल्या महिन्यात जॉन्सन्स® बेबीने ‘प्रॉमिस, पहले पल से’ हे आपले नवे मार्केटिंग कॅम्पेन सुरु केले.  ‘फक्त आणि फक्त बाळासाठी सुरक्षित इंग्रिडियंट’ पासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांच्या मदतीने, बाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळाच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करण्यात मदत करण्याची ब्रँडची बांधिलकी या कॅम्पेनमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून पालकांसोबत घनिष्ठ नाते जोडून असलेला ब्रँड या नात्याने, जॉन्सन्स® बेबीने बाळाच्या त्वचेचे पहिल्या दिवसापासून रक्षण करण्यात मदत करण्याची वचनबद्धता स्वीकारली आहे. जॉन्सन्स® बेबीच्या AR इनोव्हेशनसह या ब्रँडने आई व बाबांना बाळाच्या त्वचेच्या रक्षणासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात सक्षम बनवून त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात मोलाची साथ दिली आहे.

बाळांसाठी सर्वात सुरक्षित उत्पादने निर्माण करण्याच्या मिशनला अनुसरून, जॉन्सन्स® बेबीने अनेक दशकांचे ज्ञान व विज्ञान यांच्या साहाय्याने बाळाच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी ‘ओन्ली बेबी सेफ’ (बाळांच्या त्वचेसाठी सुरक्षित अशीच इंग्रिडियंट्स) निवडण्यासाठी एक मजबूत पाया निर्माण केला आहे.  फक्त सर्वात सुरक्षित इंग्रिडीयंट्स निवडून सर्वात प्रगत फॉर्म्युला निर्माण करून बाळाची अधिकाधिक चांगली देखभाल करता यावी यासाठी हा ब्रँड सातत्याने प्रयत्नशील असतो. व्यक्तिगत देखभाल उद्योगक्षेत्रात वापरले जाणारे फक्त २% इंग्रिडीयंट्स जॉन्सन्स® बेबीची, बाळाच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमधील सुरक्षितता व शुद्धता यांची जागतिक मानके पूर्ण करू शकतात. त्यांची उत्पादने काटेकोर वैज्ञानिक संशोधनाच्या साहाय्याने तयार करण्यात येतात. त्यांचे फॉर्म्युले डॉक्टरांनी (पेडियाट्रिशियन्स आणि डर्मेटोलॉजिस्ट्स) तपासलेले असतात, तसेच त्यामध्ये पॅराबेन्स, सल्फेट्स, डाय इत्यादी हानिकारक रसायने नसतात.

 

उत्पादनांमधील इंग्रिडीयंट्सची सर्व माहिती संपूर्ण पारदर्शकतेने दिली जावी यासाठी ब्रँड करत असलेल्या प्रयत्नांबाबत केनव्यूचे बिझनेस युनिट हेड आणि व्हीपी मार्केटिंग श्री. मनोज गाडगीळ यांनी सांगितलेआमचा हा नवा उपक्रम ग्राहकांचे विचारभावना सखोलपणे जाणून घेतल्यावर हाती आलेल्या निष्कर्षांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.  आमच्या असे निदर्शनास आले आहे कीप्रत्येक आईला आपल्या बाळासाठी जेजे सर्वात चांगले करता येईल ते करायचे असते आणि फक्त सर्वात सुरक्षित उत्पादने वापरायची असतातपण खूपच कमी मातांना उत्पादनांमधील इंग्रिडीयंट्सची आणि ती बाळासाठी सुरक्षित आहेत की नाही याची माहिती असते.

 

आपल्या बाळांच्या त्वचेवर वापरण्यासाठी पालक जी उत्पादने घेतात त्याविषयी त्यांना पूर्ण खात्री असली पाहिजेही बाब जॉन्सन्स® बेबीमध्ये आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही असे मानतो कीसंपूर्ण पारदर्शकता आणि माहिती यामुळेच हे शक्य होऊ शकते. बाळाच्या त्वचेची देखभाल करण्याच्या उत्पादनांमधील प्रवर्तक ब्रँड म्हणून जॉन्सन्स® बेबीने नेहमीच अशी उत्पादने बनवली आहेत जी बाळाच्या नाजूक त्वचेचे रक्षण करतात. पालकांना उत्पादनांबद्दल वाटणारा विश्वास अधिक मजबूत व्हावा आणि त्यांना आपल्या बाळाला दिलेले सर्वात मोठे वचन पूर्ण करण्यात त्यांची मदत करण्यासाठी आम्ही आमचे नवे पॅकेजिंग तयार केले आहे आणि त्यामध्ये नाविन्यपूर्ण AR तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. यामुळे पालकांना संपूर्ण पारदर्शकता मिळतेआम्ही जी विशेष इंग्रिडीयंट्स वापरतो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या वापरामागील विज्ञानाविषयी माहिती मिळते.”

 

जॉन्सन्स® बेबीने एक डिजिटल फिल्म तयार केली आहे.  बाळासाठी सुरक्षित इंग्रिडीयंट्स वापरणे गरजेचे असल्याबद्दल मातांनी व्यक्त केलेली मतेजॉन्सन्स®च्या सर्वात नवीन पॅकेजिंग आणि AR इनोव्हेशनसह पालकांना सर्वोत्कृष्ट अनुभव मिळवून देण्याची ब्रँडची वचनबद्धता देखील यामध्ये दर्शवण्यात आली आहे. जागरूकता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ करण्यासाठीहा ब्रँड भारतभरातील २५००० रिटेल दुकानांमध्ये AR तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळवून देत आहे. इन्फ्ल्यूएंसर्स व मॉमी कम्युनिटीजसोबत संपर्क व संवाद साधून त्यांना या नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहेजेणेकरून त्यांच्या फॉलोअर्सपर्यंत देखील ती माहिती पोहोचेल व त्यांना त्यांच्या बाळांसाठी सर्वात सुरक्षित उत्पादने अगदी विश्वासाने निवडता येतील.

जॉन्सन्स® बेबीच्या या उपक्रमामुळे बाळांच्या देखभालीमध्ये एक नवे युग सुरु झाले आहे जे आधुनिक पालकांच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा पूर्ण करणारे आहे.  पालकांना जी माहिती हवी ती पुरवून त्यांना सक्षम करणे हा जॉन्सन्स® बेबीचा उद्देश आहेत्याद्वारे हा ब्रँड आयुष्यभर सोबत राहील असा विश्वास व देखभालीचा पाया रचत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading